ETV Bharat / state

'न्यायालयाची स्थगिती हटताच सुरू होणार नवीन ठाणे रल्वे स्थानकाचे काम' - पालकमंत्री एकनाथ शिंदे

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने गेल्या चार वर्षांमध्ये या प्रकल्पापुढील अनेक अडचणी दूर करण्यात यश आले. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचाही सातत्याने पाठपुरावा सुरू होता. तसेच, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही पुढाकार घेऊन महापालिकेच्या माध्यमातून अनेक सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे प्रकल्प पुढे सरकण्यास मदत झाली आहे.

railway stn
'न्यायालयाची स्थगिती हटताच सुरू होणार नवीन ठाणे रल्वे स्थानकाचे काम'
author img

By

Published : Dec 11, 2019, 11:45 AM IST

ठाणे - ठाणे आणि मुलुंड दरम्यान विस्तारित ठाणे स्थानक प्रकल्पासाठी आवश्यक त्या पूर्तता ठाणे महापालिकेकडून करण्यात आल्या आहेत. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातूनही काही कागदपत्रांचे काम सुरू आहे. या नियोजित स्थानकासाठी एकूण 15 एकर जागा आरक्षित करण्यात येणार असून या जागेबाबत न्यायालयातून स्टे उठल्यावर लवकरात लवकर नवीन स्टेशनचे काम सुरू होणार असल्याची माहिती ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दिली.

ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून गेली अनेक वर्षे ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान मनोरुग्णालया लगतच्या जागेवर विस्तारित ठाणे रेल्वे स्थानक बांधण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे. दीडशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या ठाणे स्थानकाची क्षमता अपुरी पडत आहे. या ठिकाणाहून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्यामुळे दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती. शिवसेना आणि महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेने हा प्रकल्प करण्यास मान्यता दिली होती. मात्र, नियोजित स्थानकाची जागा आरोग्य विभागाच्या मालकीची असल्यामुळे आजवर हा प्रकल्प रखडला होता.

तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने गेल्या चार वर्षांमध्ये या प्रकल्पापुढील अनेक अडचणी दूर करण्यात यश आले. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचाही सातत्याने पाठपुरावा सुरू होता. तसेच, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही पुढाकार घेऊन महापालिकेच्या माध्यमातून अनेक सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे प्रकल्प पुढे सरकण्यास मदत झाली आहे. ठाणे महापालिका या जागेच्या बदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर देणार असून स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत या ठिकाणी विस्तारित ठाणे स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे असलेल्या जागेच्या बाजूला काही झोपड्या आहेत, त्यांच्यासाठीदेखील या रेल्वे प्रकल्पानंतर त्याच ठिकाणी SRA किंवा क्लस्टर मार्फत इमारत उभी करणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे. तसेच मुलुंड आणि ठाणे यादरम्यान होणाऱ्या नवीन रेल्वे स्टेशन मुले ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून भविष्यात ठाण्याचा वाढता रेल्वे प्रवाशांचा भार कमी होणार आहे.

Intro:न्यायालयाचा स्टे उठल्यावर लागलीच सुरु होणार नवीन ठाणे स्थानकाचे कामBody:ठाणे आणि मुलुंड दरम्यान विस्तारित ठाणे स्थानक प्रकल्पला ठाणे महापालिकेकडून सर्व पूर्तता करण्यात आली आहे . सर्व अधिकारी या बाबत पाठपुरावा करीत आहे . तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातून काही कागद पात्रांचे काम सुरु आहे . एकूण 15 एक्क्कर जागा असून या जागे बाबत न्यायालयातून स्टे उठल्यावर लवकरात लवकर नवीन स्टेशन काम सुरु होणार असल्याचे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे .
ठाणे रेल्वे स्थानक आणि परिसरातील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून गेली अनेक वर्षे ठाणे आणि मुलुंड यांच्या दरम्यान मनोरुग्णालयालगतच्या जागेवर विस्तारित ठाणे स्थानक बांधण्याची मागणी शिवसेना करत आहे. दीडशे वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या ठाणे स्थानकाची क्षमता संपली असून दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असल्यामुळे दुर्घटना घडण्याची भीतीही व्यक्त करण्यात येत होती. शिवसेना आणि महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर रेल्वेने हा प्रकल्प करण्यास मान्यता दिल्यानंतरही सदर जागा आरोग्य विभागाच्या मालकीची असल्यामुळे आजवर हा प्रकल्प पुढे सरकला नव्हता. परंतु, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने गेल्या चार वर्षांमध्ये या प्रकल्पापुढील अनेक अडचणी दूर करण्यात यश आले. ठाण्याचे खासदार राजन विचारे यांचाही सातत्याने पाठपुरावा सुरू होता. तसेच, ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनीही पुढाकार घेऊन महापालिकेच्या माध्यमातून अनेक सकारात्मक निर्णय घेतल्यामुळे प्रकल्प पुढे सरकण्यास मदत झाली आहे . ठाणे महापालिका या जागेच्या बदल्यात आरोग्य विभागाला टीडीआर देणार असून स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत या ठिकाणी विस्तारित ठाणे स्थानकाची उभारणी करण्यात येणार आहे.तर दुसरीकडे असलेल्या जागेच्या बाजूला काही झोपड्या आहेत त्यांना देखील या रेल्वे प्रकल्प नंतर त्याच ठिकाणी SRA किंवा क्लस्टर मार्फत इमारत उभी करणार असल्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सांगितले आहे .. तसेच मुलुंड आणि ठाणे यादरम्यान होणाऱ्या नवीन रेल्वे स्टेशन मुले ठाणेकरांना मोठा दिलासा मिळणार असून भविष्यात ठाण्याचा वाढता रेल्वे प्रवाशांचा भार कमी होणार आहे .

BYTE नरेश म्हस्के - महापौर ,ठाणे महापालिका
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.