नवी मुंबई - शहरात दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे, असं एकीकडे वाटत असतानाचं शनिवारी नवी मुंबईत 74 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर, सकारात्मक बाब म्हणजे शनिवारी 102 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता नवी मुंबई शहरात रुग्णसंख्येने धोक्याची पातळी ओलांडली असून आत्तापर्यंत 1 हजार 57 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आत्तापर्यंत नवी मुंबईत 9 हजार 943 लोकांची कोव्हिड -19 ची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 7 हजार 311 जणांची चाचणी निगेटिव्ह आली असून, 1 हजार 71 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 561 इतकी आहे. त्यातच शनिवारी 74 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असून 102 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर, आत्तापर्यंत 772 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून घरी परतले आहेत. शनिवारी दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, आत्तापर्यंत 51 व्यक्तींचा कोरोनामुळे बळी गेला आहे.