ETV Bharat / state

वसई तालुक्यात मोठे कोविड सेंटर उभारावे; अपंग जनशक्तीचे देविदास केंगार यांची मागणी

तालुक्यासाठी लवकरात लवकर ऑक्सिजनची व बेडची तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन औषधांची संख्या जास्तीत जास्त प्रमाणात वाढविण्यात यावी, अशी मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा दिव्यांग समिती सदस्य देविदास जयवंत केंगार यांनी केली आहे.

देविदास जयवंत केंगार
देविदास जयवंत केंगार
author img

By

Published : Apr 18, 2021, 6:35 PM IST

वसई - गेल्या एका वर्षांपासून कोरोना आजाराची सातत्याने वाढ होत आहे. कोरोना आजाराचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण राज्यामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. अनेकांचे रोजगारही बंद पडले आहेत. दिवसेंदिवस कोरोना हा आजार वाढत असल्याने कोरोना रुग्णांना वसई तालुक्यात ऑक्सिजन आणि बेड तसेच रेमडेसिवीर औषधांची कमतरता भासत आहे. यामुळे अनेक गोरगरिबांना हॉस्पिटलच्या पायऱ्या झिझवाव्या लागत आहे. लॉकडाऊनच्या काळात उद्योगधंदे तसेच व्यवसाय बंद पडल्याने कोरोना रुग्णांना खासगी हॉस्पिटलचा खर्च झेपत नसल्याने त्यांना सरकारी हॉस्पिटल मध्ये दाखल व्हावे लागत आहे. परंतु सरकारी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन व बेडची तसेच औषधांची संख्या कमी असल्याने काही रुग्ण दगावत आहेत.

तालुक्यासाठी लवकरात लवकर ऑक्सिजनची व बेडची तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन औषधांची संख्या जास्तीत जास्त प्रमाणात वाढविण्यात यावी, अशी मागणी अपंग जनशक्ती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा जिल्हा दिव्यांग समिती सदस्य देविदास जयवंत केंगार यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्य मंत्री , जिल्हाधिकारी तसेच वसई-विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांच्याकडे ई-मेल द्वारे मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.