ETV Bharat / state

Shahu Chhatrapati Film: छत्रपती शाहू महाराज यांच्यावर जितेंद्र आव्हाड चित्रपट काढणार - movie on shahu maharaj

Shahu Chhatrapati Film: सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली असा कोणताही चुकीचा प्रकार आम्हाला दाखवायचा नाही. एनसीपीला बदनाम करण्यासाठी अशा प्रकारचे विधान केले जात आहे.

Shahu Chhatrapati Film
Shahu Chhatrapati Film
author img

By

Published : Dec 2, 2022, 12:29 PM IST

ठाणे: महाराष्ट्राला ज्या राजाची ओळख झाली पाहिजे होती, तशी अजून झालीच नसल्याने छत्रपती शाहू महाराज यांच्यावर लवकरच चित्रपट काढणार असल्याची घोषणा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली. छत्रपती शाहू महाराज यांनी दलितांसाठी काम केले आहे, अशा महाराजांचा इतिहास पुढे आणला पाहिजे, छत्रपती शाहू महाराज यांनी बाबासाहेबांची मिरवणूक काढली होती. त्या महाराजांचा इतिहास हा महाराष्ट्राला देशाला कळायला पाहिजे. लोकांना शिवाजी महाराज, शाहू महाराज फुले व आंबेडकर हे संपूर्णपणे इतिहास दाखवणार आहे. आणि हा चित्रपट बनवताना इतिहासाचे पूर्णपणे धडे घेतले जाणार आहेत. त्याचे पुरावे घेतले जाणार आहेत.

जात पात धर्म याबद्दल कोणी आम्हाला सांगू नये: इतिहासकारांचा सहाय्य प्रामुख्याने घेतले जाणार आहे. सिनेमॅटिक लिबर्टीचे नावाखाली काही दाखवले जाणार नाही. या चित्रपटातून मला कोणालाही उत्तर द्यायचं नाही. उत्तर ही जनता देते हर हर महादेव हा दुसरा तिसऱ्या दिवशीच चित्रपटातून पळवला, हे उत्तर जनतेने दिलेले आहे. शिवाजी महाराजांशिवाय महाराष्ट्रातील मातीचा कणा देखील पूर्ण होत नाही. हे सर्व लोकांना माहित आहे. त्यामुळे जात पात धर्म याबद्दल कोणी आम्हाला सांगू नये, व ते सर्व आम्ही शोषलेला आहे. कसा छळ होतो आमच्या घरात पाहिलेला आहे, असेही राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले आहे.

हिंदू मुस्लिम एका टोकाला: राष्ट्रवादी आणि शरद पवार यांच्यावर जातीयवादाचा आरोप करणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांनाच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले असून तुम्ही भोग्याचा विषय काढला. त्याने हिंदू मुस्लिम एका टोकाला जातील, असे तुम्हाला वाटल होतं. मात्र झाला काय भोंगे बंदच झाले, पण सकाळी ब्रह्म मुहूर्तावर होणाऱ्या सगळ्या आरत्या बंद झाल्या. कुणाचं नुकसान झाला असा टोला लगावत उत्तर भारतीयांना मारलेत, तेव्हा ते हिंदू नव्हते का? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. तसेच शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या इतिहासाशी खेळण्याची मस्ती कोणीही करू नका, असा इशाराच दिला आहे.

प्रेरणा पुरंदरे यांच्याकडून घेतली: राष्ट्रवादीचा जन्म १९९९ ला झाला. त्याच दरम्यान महाराजांवर पहिलं घाणेरडं पुस्तक आल, ज्याची प्रेरणा पुरंदरे यांच्याकडून घेतली होती. त्या पुस्तकात मासाहेबांच्या चारित्र्य बद्दल आणि शिवाजी महाराजांच्या पितृत्वाबद्दल शंका घेण्यात आली. त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत काही जणांचे आभार मानले, प्रस्तावनेत आभार मानणे म्हणजे पुस्तक वाचून त्या पुस्तकाला मान्यता देणे, महाराष्ट्रात या बाबतीत पहिला आक्षेप मी घेतला. पहिल्यांदा २० हजार ते ५० हजार छोटी पुस्तके आम्ही वाटली होती. शिवाजी महाराजांच्या माता पित्याबद्दल शंका घेणाऱ्या जेम्स लेनला आम्ही माफ करावं ? त्याला माहिती पुरवणाऱ्याची माफी मागावी? नाही होणार आमच्याकडून तुम्ही काहीही करा, मराठा हा व्यापक शब्द आहे.

नेत्यांच्या विरोधात जाऊन पुरंदरेंचा विरोध: पंजाब, सिंध, गुजरात, मराठा हे राष्ट्रगीतात येत मग राष्ट्रगीत जातीय वाद आहे का ? राष्ट्रवादीमध्ये शिवाजी महाराजांवर पक्षाशी संबंध न ठेवता बोलणारा जितेंद्र आव्हाड आहे. जेव्हा पुरंदरेना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. तेव्हा पक्षातील नेत्यांच्या विरोधात जाऊन पुरंदरेंचा विरोध केला. धार्मिक धृहिकरण महाराजांनी केलं नाही. ते महाराजांच्या मार्फत केलं गेलं, महाराज अफजलखानाच्या विरोधात हरावेत म्हणून यज्ञ कोणी केली ते आम्ही सांगितलं तर आम्ही जातीयवादी, तुम्ही दादोजी कोंडदेव उध्वस्त केल्यानंतर नवीन उभा करताय. हर हर महादेव मधल्या घाणेरड्या चुका दाखवायला नको? वेगवेगळ्या माध्यमातून इतिहासाचा, महाराजांच्या इतिहासाचा विकृतीकरण करणार आणि दोष राष्ट्रवादीला देणार का ? असा सवाल राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.