ETV Bharat / state

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा अध्यक्ष चोरी करताना सापडला; आजमगढ येथे अटक

आरोपी हारुन याने तीन महिन्यांपूर्वी त्याच्या मोहल्ल्यातील बंद असलेल्या यंत्रमाग कारखान्यातील साहित्य अन्य पाच साथीदारांच्या मदतीने चोरून एका व्यापाऱ्याला विकले होते. या चोरीचा गुन्हा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.

हारुन खान
author img

By

Published : Apr 9, 2019, 11:24 AM IST

ठाणे - बंद कारखान्यातील यंत्रसामग्री चोरून विकल्याच्या आरोपाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाला उत्तर प्रदेशमधील आजमगढ येथून अटक करण्यात आली आहे. भिवंडी शहरातील नवीवस्ती भागातील कारखान्यातून यंत्रसामुग्री चोरल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हारुन अबुलजैस खान (३५ ) असे अटक केलेल्या युवक अध्यक्षाचे नाव आहे.

आरोपी हारुन याने तीन महिन्यांपूर्वी त्याच्या मोहल्ल्यातील बंद असलेल्या यंत्रमाग कारखान्यातील साहित्य अन्य पाच साथीदारांच्या मदतीने चोरून एका व्यापाऱ्याला विकले होते. या चोरीचा गुन्हा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. यातील तीन चोरट्यांना यापूर्वीच अटक केली आहे. मात्र, हारून खान याला पोलीस अटक करतील याची कुणकूण लागताच तो त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेशमध्ये पळून गेला होता.

तो अजमगढ येथे असल्याचे समजताच भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे यांचे पोलीस पथक उत्तर प्रदेशमध्ये गेले. तिथे हारुन खान याला बेड्या ठोकण्यात आल्या. आरोपी हारून खान याला आज (मंगळवारी) भिवंडीत दाखल करण्यात येणार आहे.

यंत्रमाग कारखान्यातील साहित्य चोरून विकणाऱ्या राष्ट्रवादीच्या युवक अध्यक्षाला युपीमधून अटक 

ठाणे :- भिवंडी शहरातील नवीवस्ती भागातील बंद कारखान्यातील यंत्रसामग्री चोरून विकल्याच्या आरोपाखाली भिवंडी शहर पोलिसांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षाला उत्तर प्रदेशमधील आजमगढ येथून मोठ्या शिताफीने पकडून गजाआड केले आहे. हारुन अबुलजैस खान (३५ रा. शास्त्रीनगर ) असे अटक केलेल्या युवक अध्यक्षाचे नांव आहे.

आरोपी हारुन याने तीन महिन्यांपूर्वी त्याच्या मोहल्ल्यातील बंद असलेल्या यंत्रमाग कारखान्यातील साहित्य अन्य पाच साथीदारांच्या मदतीने चोरून एका व्यापाऱ्याला विकले होते. या चोरीचा गुन्हा भिवंडी शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असता पोलिसांनी यातील तीन चोरट्यांना यापूर्वीच अटक केली आहे. मात्र हारून खान याला पोलीस अटक करतील याची कुणकूण लागताच तो त्याच्या मूळ गावी उत्तर प्रदेशमध्ये पळून गेला होता.

अखेर पोलीस त्याचा शोध घेत असताना तो अजमगढ येथे असल्याचे समजताच भिवंडी शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे यांचे पोलीस पथक उत्तर प्रदेशमध्ये जाऊन चोरटा हारून खान याला बेड्या ठोकल्या आहेत. आता हे पोलीस पथक आरोपी हारून खान यांना घेऊन मंगळवारी दुपारी भिवंडीत दाखल होणार आहे. 

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.