ठाणे: विवियाना मॉल मधील मराठी चित्रपट हर हर महादेव चित्रपट बंद पाडून प्रेक्षकाला मारहाण केल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांच्यासह 12 आरोपीना जामीन मंजूर करण्यात आला. सुट्टीच्या विशेष न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती पाल यांनी प्रथम 14 दिवसाची न्यायालयिन कोठडी सुनावली. तर नंतर जामीन अर्जावर सुनावणी करीत 15 हजाराच्या जातमुचकल्यावर सुटकेचा निर्णय दिला. तत्पूर्वी जितेंद्र आव्हाड यांना वर्तकनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. जितेंद्र आव्हाडांना न्यायालयाने जमीन मंजूर केल्यानंतर पुन्हा ठाणे न्यायालयात नेऊन न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून सुटका करण्यात आली.
अटक कशी बेकायदेशीर: शनिवारी सुट्टीच्या न्यायालयात राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अन्य आरोपीना ११ वाजण्याच्या सुमारास हजर करण्यात आले. यावेळी आव्हाड यांचे वकील ॲड प्रशांत कदम यांनी आव्हाड यांची अटक कशी बेकायदेशीर आहे. यावर युक्तिवाद केला. आव्हाड आणि इतर लोकांवर दाखल केलेले गुन्हे चुकीचे असून हे गुन्हे जाणीवपूर्वक दाखल करण्यात आले असल्याचे कदम यांनी सांगितले. आव्हाड यांना जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा जामीनपात्र कलम लावण्यात आले होते. आता कलमात वाढ करण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचा युक्तीवाद केला. त्यानंतर सरकारी वकील ॲड. अनिल नंदगिरी यांनी आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांकडे पुरावे असून त्यामुळे त्यांच्या कस्टडीची मागणी त्यांनी यावेळी न्यायालयात केली.
प्रथम न्यायालयीन कोठडी: त्यानंतर १५ हजाराचा जातमुचल्याचा जामीन, राष्ट्रवादीचे आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांचे वकील ॲड प्रशांत कदम आणि सरकारी वकील अनिल नंदगिरी यांनी आव्हाड यांच्याविरोधात पोलिसांकडे पुरावे असून त्यामुळे त्यांच्या कस्टडीची मागणी त्यांनी यावेळी न्यायालयात केली. डॉ. आव्हाड यांच्यावर कलम ७ लावण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. डॉ.आव्हाड याना जामीन मिळू नये म्हणून शुक्रवारपासून पोलीस प्रयत्नशील होते. कारण वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा हा जामीन पात्र गुन्हा होता. मात्र अजामीनपात्र गुन्हा दाखल केल्यास डॉ. आव्हाड याना जमीन मिळणार नाही. दोन्ही वकिलांच्या युक्तिवादानंतर जवळपास १ तासभर निकाल राखून ठेवला आणि आ. आव्हाड याना १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायालयात कलम ७ लावण्यात अपयश आल्यानंतर आणि पुन्हा जामीन अर्ज सादर केल्यानंतर न्यायमूर्ती श्रीमती पाल यांनी १५ हजाराच्या जातमुचकल्याच्या जामिनावर सुटकेचा निकाल दिला.
दुसऱ्या दिवशीही वर्तकनगर पोलीस ठाण्याचा चक्काजाम: वर्तकनगर पोलीस ठाण्यात शुक्रवारी आ. आव्हाड याची सुटका न झाल्याने शनिवारी सकाळीही वर्तकनगर पोलीस ठाण्याचा चक्काजाम आणि घोषणाबाजी सुरूच होती. शनिवारी पुन्हा आ. आव्हाड याना न्यायालयात नेले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा ठाणे न्यायालयाकडे वळविला. त्यानंतर न्यायालयाने दोन्ही वकिलांच्या युक्तीवादामुळे आ.आव्हाडांना न्यायालयाने १४ दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर आ. आव्हाड यांच्या वकिलाने जामीन अर्ज सादर केला. त्यावर सुनावणी करताना न्यायमूर्तीनी १५ हजाराच्या जामिनावर सुटका करण्याचा निकाल दिला.
आव्हाड म्हणाले पोलिसांचा दोष नाही: शुक्रवारपासून वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या समोर सुरु असलेल्या गदारोळ आणि घोषणाबाजीला उधाण आले होते. वर्तकनगरमद्ये दाखल गुन्ह्यात शुक्रवारीच सुटका झाली असती. मात्र राजकीय हस्तक्षेप करणारे चाणक्य याना आ.आव्हाड हे सुटणे पचनी पडत नसल्याने कलम ७ चा घाट घातला. मात्र न्यायालयात वकिलांनी केलेल्या युक्तीवाद यामुळे कलम ७ हे कायद्याच्या चौकटीत बसले नाही. त्यामुळे न्यायालयाने जामीन मंजूर केला. शुक्रवार पासून सुरु असलेले राजकीय हस्तक्षेपाने गदारोळ माजला. यात वर्तकनगर पोलिसांचा दोष नसल्याची प्रतिक्रिया आ. आव्हाड यांनी व्यक्त केली.