ETV Bharat / state

'निवडणूक तोंडावर, राष्ट्रवादीच्या गोटात धावपळ'; ठाणे मतदारसंघासाठी उमेदवारच सापडेना

येणारी लोकसभा निवडणूक पाहता सर्वच पक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारीदेखील कामाला लागले आहेत. लोकसभेच्या ठाणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादीला उमेदवारच सापडत नसल्याने राष्ट्रवादीकडून उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ठाणे मतदारसंघासाठी उमेदवारच सापडेना
author img

By

Published : Mar 9, 2019, 9:26 PM IST

ठाणे - येणारी लोकसभा निवडणूक पाहता सर्वच पक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पदाधिकारीदेखील कामाला लागले आहेत. लोकसभेच्या ठाणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादीला उमेदवारच सापडत नसल्याने राष्ट्रवादीकडून उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना-भाजपची युती झाल्याने ठाणे लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना विजयाची खात्री वाटत आहे. असे असताना दुसरीकडे विरोधकांना उमेदवारच सापडत नसल्याची बाब सेनेच्या पथ्यावर पडली असल्याचे जाणकार बोलत आहेत.
नवी मुंबईतील नाईक कुटुंबीयांनी उमेदवारी नाकारल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस नवीन उमेदरावराचादेखील शोध घेत आहे. लोकसभा निवडणुकीसाठी असलेले ६ विधानसभा मतदारसंघ हे मोठे असून यासाठी भक्कम पाठबळ असणे गरजेचे आहे.

बाईट - जयंत पाटील

राष्ट्रवादीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदवाराचा शोध सुरू केला आहे. भाजप सेनेला टक्कर द्यायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसला वर्षभरापूर्वी नियोजन करून पूर्व तयारी करायला हवी होती. मात्र ती न झाल्याने ऐन वेळेस पक्षाच्या नेत्यांना धावपळ करावी लागत आहे.
या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमधून दोन नावे चर्चेत होती. आनंद परांजपे आणि ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांना दोघांना उमेदवारीबाबत पक्षाकडून विचारणा झाली असून दोघांनीही हवा तसा प्रतिसाद दिलेला नाही.

काही दिवसापूर्वी ठाणे लोकसभेसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक ठाण्यात पार पडली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, लोकनेते गणेश नाईक, ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे, महापालिका विरोधीपक्ष नेते मिलिंद पाटील आदीसह ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते हनुमंत जगदाळे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला हे उपस्थित होते.

या बैठकीत राष्ट्रवादीचा ठाणे लोकसभेचा उमेदवार निश्चित करण्यात आल्याची हवा निर्माण करण्यात आली होती. मात्र, अद्यापही उमेदवारी कुणाला द्यावी यावर शिक्कामोर्तब झाले नसल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येत आहे. ठाणे लोकसभा मतदार संघातून माजी खासदार संजीव नाईक यांच्या जागी त्यांचे वडील गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत बैठकीत सूर उमटले होते.मात्र अंतर्गत गटबाजीमुळे गणेश नाईक ठाण्याच्या सुभेदारीसाठी तयार नसल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आगामी निवडणुकीच्या रिंगणात कुणाला उमेदवारी द्यावी याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच ठरवणार असल्याचे एका गटाचे म्हणणे आहे. त्यामुळे तूर्तास तरी सेनेसाठी हा गड सोपा बनल्याच्या वावड्या राजकीय वर्तुळात उडत आहेत.

Intro:निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचा उमेदवाराचा शोध सुरू पक्षातील दिग्गजांनी नाकारली उमेदवारीBody:येणारी लोकसभा निवडणुका पाहता सर्वच पक्षांसह राष्ट्रवादी काँग्रेस चे नेते पदाधिकारी देखील कमला लागले असुन लोकसभेच्या ठाणे मतदारसंघासाठी राष्ट्रवादीला उमेदवारच सापडत नसल्याने राष्ट्रवादी कडून उमेदवारीची माळ कोणाच्यातरी गळ्यात घालण्याची चिन्हे आहेत.
शिवसेना-भाजपची युती झाल्याने ठाणे लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना विजयाची खात्री वाटत असताना दुसरीकडे विरोधकांना उमेदवारच सापडत नसल्याची बाब सेनेच्या पथ्यावर पडली असल्याचे जाणकार बोलत आहेत.
नवीमुंबईतील नाईक कुटुंबीयांनी उमेदवारी नाकारल्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस नवीन उमेदरावराचा देखील शोध घेत आहे .लोकसभा निवडणुकीसाठी असलेले मोठे 6 विधानसभा मतदारसंघ हे मोठे असुन यासाठी भक्कम पाठबळ असणे गरजेचे आहे राष्ट्रवादीने ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेदरावरचा शोध सुरू केला आहे भाजप सेनेला टक्कर द्यायची असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस ला वर्षभरापूर्वी नियोजन करून ही पूर्व तयारी करायला हवी होती मात्र ती न झाल्याने ऐन वेळेस पक्षाच्या नेत्यांना धावपळ करावी लागत आहे.

या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस मधून दोन नावे चर्चेत होती आनंद परांजपे आणि ठाण्याचे माजी पालकमंत्री गणेश नाईक यांना दोघांना उमेदवारी बाबत पक्षाकडून विचारणा झाली असून दोघांनीही हवा तसा प्रतिसाद दिलेला नाहीय.
 काही दिवसापूर्वी ठाणे लोकसभेसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक ठाण्यात पार पडली होती.या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, लोकनेते गणेश नाईक,ठाणे शहर अध्यक्ष आणि माजी खासदार आनंद परांजपे,महापालीका विरोधीपक्ष नेते मिलिंद पाटील आदीसह ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादीचे गटनेते हनुमंत जगदाळे,राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला हे उपस्थित होते.या बैठकीत राष्ट्रवादीचा ठाणे लोकसभेचा उमेदवार निश्चित करण्यात आल्याची हवा निर्माण करण्यात आली होती.मात्र,अद्यापही उमेदवारी कुणाला द्यावी यावर शिक्कामोर्तब झाले नसल्याचे राष्ट्रवादीच्या गोटातून सांगण्यात येत आहे. ठाणे लोकसभा मतदार संघातून माजी खासदार संजीव नाईक यांच्या जागी त्यांचे वडील गणेश नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत बैठकीत सूर उमटले होते.मात्र,अंतर्गत गटबाजीमुळे गणेश नाईक ठाण्याच्या सुभेदारीसाठी तयार नसल्याचे बोलले जात आहे.  दरम्यान,आगामी निवडणुकीच्या रिंगणात कुणाला उमेदवारी द्यावी याबाबत पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हेच ठरवणार असल्याचे एका गटाचे म्हणणे आहे.त्यामुळे,तूर्तास तरी सेनेसाठी हा गड सोपा बनल्याच्या वावड्या राजकीय वर्तुळात उडत आहेत.
Byte जयंत पाटील (राष्ट्रवादी काँग्रेर्स नेते)Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.