नवी मुंबई - शेतकरी असल्याचा बनावट दाखला तयार करून उरण परिसरात ८० एकर जमिन विकत घेणाऱ्या प्रसिध्द बांधकाम व्यावासायिकाला मुंबई पोलिसांनी गजाआड केले. भूपेंद्र शहा असे त्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी अधिक तास नवी मुंबई पोलीस करत आहेत.
प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक भूपेंद्र शहा याने आपल्या साथीदारांच्या साहायाने खोटी कागदपत्रे दाखवून लातूर येथील शेतकरी असल्याचा दाखला मिळवला. शेतजमीन विकत घेण्यासाठी शेतकरी असल्याचा दाखल शासन दरबारी द्यावा लागत असल्याने भूपेंद्र शहा याने लातूर येथून शासकीय यंत्रणेला हाताशी पकडून बनावट शेतकरी असल्याचा दाखल मिळवला होता. याच दाखल्याच्या साह्याने भूपेद्र शहा याने उरण येथील कोट्यवधी रूपयांची ८० एकर जमीन विकत घेतली. याबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी तपास केला असता यात बनावट दाखल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी नवी मुंबईतील भूमी बिल्डर्स ग्रुपचे मालक प्रसिध्द बिल्डर भूपेंद्र शहा याच्यासह तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.