ETV Bharat / state

Navi Mumbai kidnapping News: वडापावचं आमिष दाखवून 4 वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण; 48 तासांत पोलिसांनी ठोकल्या बेड्या

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 28, 2023, 8:54 PM IST

Navi Mumbai kidnapping News : नेरुळ रेल्वे स्टेशन परिसरात एक अपहरणाची घटना घडली होती. 4 वर्षाच्या मुलीला एक केरळचा व्यक्ती अपहरण करून नेत होता. चिमुरड्यांची तस्करी करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी अटक केलीय. आपण सविस्तर हे प्रकरण जाणून घेऊ या.

Navi Mumbai kidnapping News
चार वर्षाच्या मुलीचं अपहरण केलं
चार वर्षाच्या मुलीचं अपहरण

नवी मुंबई Navi Mumbai kidnapping News: नेरुळ रेल्वे स्टेशन परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या 4 वर्षीय चिमुरडीचं अपहरण करून परराज्यात पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पोलिसांनी अवघ्या 48 तासांच्या आत अटक केलीय. अपहरण करण्यात आलेल्या चिमुरडीला केरळ येथे नेऊन विकण्याच्या तयारीत असलेल्या मनी थॉमसच्या (वय74) 'करावे' गावातून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. थॉमसच्या तावडीतून सुटका केल्यानंतर पोलिसांनी त्या लहान मुलीला पालकांच्या हवाली केलंय.

वडापावचं दाखवलं अमिष : 21 तारखेला गुरुवारी दुपारच्या सुमारास आरोपी थॉमसला नेरुळ पूर्वेला असलेल्या झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या कुटुंबातील तीन भावंडं फुटपाथवर खेळताना आढळली होती. कामात व्यस्त असलेल्या आईवडिलांची नजर चुकवत या तीन भावंडांना थॉमसने वडापावचं अमिष दाखवलं. तिन्ही मुलांना घेऊन तो वडापावचा गाडा शोधू लागला. मात्र, जवळ कुठेही वडापावचा गाडा आढळला नाही. त्यामुळं त्यानं मुलांना पाणीपुरी खाऊ घातली. पाणीपुरी खात असताना इतर दोन भावंडांना चकवा देत थॉमसनं 4 वर्षीय मुलीला काखेत घेतलं आणि रिक्षानं पळ काढला. आपली दोन मुलं आहेत. मात्र, तिसरी मुलगी सापडत नसल्यानं चिमुरडीच्या आईवडिलांनी रात्री उशीरा पोलीस स्टेशन गाठलं आणि तक्रार नोंदवली.

'कसा' लावला चिमुरडीचा शोध : अपहृत मुलीच्या आईवडिलांनी दिलेल्या तक्रारीची गंभीरता पोलिसांनी लक्षात घेतली. नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ढगे व सह पोलीस निरीक्षक निलेश शेवाळे व गुन्हे प्रकटीकरण पथकानं अपह्रत मुलीची त्वरित शोधाशोध सुरु केली. पोलिसांनी नेरुळ परिसरातील दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. त्यानंतर शनिवारी रात्री आरोपीला करावे गावातून अपहृत मुलीसह ताब्यात घेतलंय.

अपहरणामागे मुलीला विकण्याचा उद्देश : केरळवासी थॉमसने अपहरण केलेल्या मुलीची ओळख पटू नये, म्हणून अपहरण केल्यानंतर तीचे केस कापले. तसेच तिला नवीन फ्रॉक देखील घातला. अशी सगळी तयारी झाल्यानंतर थॉमस चिमुरडीसह मुंबई सोडण्याच्या तयारीत होता. मात्र नेरुळ पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकानं अथक परिश्रम घेऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे आरोपीचा माग काढला. आरोपी हा नेरुळमधील करावे गावात राहत असल्याचे निष्पन्न होताच, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. त्याची चौकशी केल्यानंतर त्याने या मुलीचं अपहरण केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्या घरामध्ये असलेल्या 4 वर्षीय अपह्रत मुलीला ताब्यात घेऊन तिची सुटका केली.

हेही वाचा :

  1. Hemant Parakh Kidnapping Case : बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख अपहरण प्रकरणाचा उलगडा;1 कोटी 42 लाखांसह चार संशयित अटकेत
  2. Pimpri Chinchwad Crime : व्यावसायिकाच्या मुलाचं अपहरण करणाऱ्या आरोपीला अटक, गुन्ह्याचं कारण समजून बसेल धक्का
  3. Murder in Thane : ठाण्यात गँगवॉर? प्रतिस्पर्धी टोळीकडून अल्पवयीन गुन्हेगाराचे अपहरण करून खून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.