ETV Bharat / state

नवी मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना उद्या ५ ऑगस्टला सुट्टी

सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाण्यासह आता नवी मुंबईतील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.

नवी मुंबईतील शाळा महाविद्यालयांना उद्या ५ ऑगस्टला सुट्टी
author img

By

Published : Aug 4, 2019, 10:11 PM IST

नवी मुंबई - सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणेसह आता नवी मुंबईतील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे आज रविवारच्या सुट्टीनंतर उद्या पुन्हा एक सुट्टी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण दिसत आहे.

नवी मुंबईतील शाळा-महाविद्यालयांना उद्या ५ ऑगस्टला सुट्टी

‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून, सुट्टी मिळेल काय?’ चिमुकल्यांच्या ओठावरले हे गाणे आज पावसाने खरे ठरवले. गेल्या ४ दिवसांपासून सुरू असलेल्या अस्मानी संकटामुळे नवी मुंबईची दाणादाण उडाली आहे. त्यातच हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबईतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

पावसाचा जोर आजच्या दिवशीही कायम राहिल्याने सीबीडी-बेलापूर, नेरूळ, सीवूडस, वाशी, ऐरोली येथील सखल भागांत पाणी साचले होते. सीबीडीतील सेक्‍टर ४ येथील बस डेपोला अक्षरशः तळ्याचे रूप आले होते. त्यामुळे प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागत होती. एनएमएमटीच्या बसही यामुळे उशिराने धावत होत्या. ठाणे जिल्ह्यात मागील २ दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार ५ ऑगस्ट म्हणजेच उद्या देखील अतिवृष्टीची शक्यता आहे.

Intro:बातमीला व्हिडीओ सोबत जोडला आहे

नवी मुंबई

सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबई, ठाणे सह नवी मुंबईतील ही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे मुंबईसह नवी मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर शाळांना ही सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला.
Body:‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय, शाळेभोवती तळे साचून, सुटी मिळेल काय,’ चिमुकल्यांच्या ओठावरले हे गाणे आज भोलनाथने आणि दमदार बरसलेल्या पावसाने खरे केले. मुसळधार पावसाने बच्चेकंपनीला दुहेरी आनंद दिला. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अस्मानी संकटामुळे नवी मुंबईची दाणादाण उडाली आहे. त्यातच हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नवी मुंबईतील शाळा- महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
Conclusion:पावसाचा जोर आजच्या दिवशीही कायम राहिल्याने सीबीडी-बेलापूर, नेरूळ, सीवूड्‌स, वाशी, ऐरोली येथील सखल भागांत पाणी साचले होते. सीबीडीतील सेक्‍टर ४ येथील बसडेपोला अक्षरशः तळ्याचे रूप आले होते. त्यामुळे प्रवाशांना गुडघाभर पाण्यातून ये-जा करावी लागत होती. एनएमएमटीच्या बसही यामुळे उशिराने धावत होत्या. ठाणे जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून अतिवृष्टी होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार 5 ऑगस्ट म्हणजेच उद्या देखील अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर केली आहे. त्यामुळं आजच्या रविवारच्या सुट्टीनंतर उद्या पुन्हा एक सुट्टी मिळणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये मात्र आनंदाचे वातावरण आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.