ठाणे: गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे सतत मुख्यमंत्र्यांना नाहक डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. काही ना काही कारणावरून आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टार्गेट करून आव्हाने देत आहेत. यातच आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना माझ्या विरोधात निवडणूक लढवण्याच आव्हानं दिले. आता ठाण्यातील शिंदे गटाकडून ठाकरे यांची खिल्ली उडवली जात आहे. विधानसभा निवडणुकांपुर्वी ठाणे महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत कोपरी प्रभागातून माझ्यासारख्या साध्या कार्यकर्त्याच्या विरोधात नगरसेवकपदाची निवडणुक लढून दाखवा आणि त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर निवडणुक लढा, असे खुले आव्हान नरेश म्हस्के यांनी आदित्य ठाकरे यांना मंगळवारी पत्रकार परिषदेत दिले. तसेच आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी कुणीही अडविलेले नसल्यामुळे तूम्ही प्रथम राजीनामा द्या, उगाच वायफळ बडबड करू नका, असा टोलाही त्यांनी लगावला.
उगाच वायफळ बडबड सुरू: उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्यावेळी त्यांनी आमदारकीचा सुद्धा राजीनामा देतो असे जाहीर केले होते. तरी सुद्धा दोन्ही वेळा अधिवेशनामध्ये ते भाषण करताना दिसले. यावरूनच यांची बडबड काय असते, हे दिसून येत आहे. आता त्याचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांनी तशीच बडबड सुरू केली आहे. अशी टिकाही म्हस्के यांनी केली. सचिन आहिर यांनी शिवसेना संपविण्याकरिता काम केले. कित्येकवेळा त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे पुतळे जाळून शिवसेनाविरोधात आंदोलने केली. हेच आहिर आदित्य यांच्यासमोर निवडणुकीत उभे राहू नयेत म्हणून आमदार सुनील शिंदे यांना घरी बसविले. तर आदित्य ठाकरे हे बालिश बुद्धीचे आहेत, आदित्य ठाकरे यांनी आपले आमदार पद शाबूतसाठी काहिचा बळी देखील घेतला आहे. स्वतःचा आमदारकीचा मतदारसंघ सोडून वरळीत जावे लागले आहे. ते कधी शाखा प्रमुख तरी होते का ? आदित्य ठाकरे हे कोणाला चेलेंच करत आहे. तुम्ही नगरसेवकांच्या निवडणुकीत माझा समोर उभे राहून निवडून येऊन दाखवा असे जाहीर आव्हान म्हस्के यांनी केले.
मी मोठी-मोठी आव्हाने स्वीकारतो: मी असले छोटे आव्हान स्वीकारत नाही. जे आव्हान स्वीकारायचे होते ते सहा महिन्यांपूर्वी स्वीकारले असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे यांच्या आव्हानाला केराची टोपली दाखवली आहे. आज मंगळवार ( 7 फेब्रुवारी) रोजी सायंकाळी वरळीत आयोजीत कार्यक्रमात बोलत होते. तसेच, रोज खोके आणि गद्दार या दोन शब्दांनी टीका करणारांना मी कामाने उत्तर देतो असही शिंदे यावेळी म्हणाले आहेत. सध्या काही लोक सकाळी उठले की फक्त गद्दार आणि खोके असे शब्द आमच्याबद्दल वापरतात. या शब्दांशिवाय त्यांच्याकडे काहीही राहिलेले नाही. मी असल्या गोष्टींवर भाष्य करत नाही तर मी माझ्या कामाने उत्तर देत असतो असही शिंदे यावेळी म्हणाले. त्याच्यावर भाष्य करत नाहीत. काही लोक आव्हान देत आहेत. त्यावर माझ्या सहकाऱ्यांनी अगोदरच सांगितलेले आहे की, एकनाथ शिंदे छोटी आव्हान स्वीकारत नाही. मी मोठी-मोठी आव्हाने स्वीकारतो.असे एकनाथ शिंदे यांनी यांनी काल सांगितले.