ETV Bharat / state

Narayan Rane : आदित्य ठाकरे बालिश, फोटो येतील म्हणून भारत जोडो यात्रेत गेला - नारायण राणे

author img

By

Published : Nov 19, 2022, 12:01 PM IST

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठाकरे पिता पुत्रांसह उद्धव ठाकरे सेनेवर टीकेची झोड ( Narayan Rane criticize Aditya Thackeray ) उठवली. आपले फोटो येतील म्हणून आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत गेले. असे म्हणत त्यांनी टीका केली.

Narayan Rane
नारायण राणे

ठाणे : आदित्य ठाकरे यांच्यावर मी कधी काय बोलत नाही, तो बालिश आहे, कधी कोणाला भेटायला ( Aditya Thackeray childish says Narayan Rane ) जातील. सावरकर यांचे देशासाठी मोठे योगदान आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे सावरकरांना का मानत होते? याचा आदित्यला गंध नाही. ना त्याला माहित ना त्याचे वडील उद्धव ठाकरे यांना माहीत. आपले फोटो येतील म्हणून ते भारत जोडो यात्रेत गेले. राहुल गांधी सावरकर यांच्याबद्दल बोलले याची कोणत्याही प्रकारची चीड त्यांना आलेली नाही. अशी खरमरीत टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर केली. डोंबिवलीमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी ठाकरे पिता पुत्रांसह उद्धव ठाकरे सेनेवर टीकेची झोड ( Narayan Rane criticize Aditya Thackeray ) उठवली.

नारायण राणे

गपचूप बदले घेतले जायचे ? : बदल्याची भाषा महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदा ऐकली असे विधान राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे असा प्रश्न पत्रकारानी विचारताच जाऊ दे, त्यांची नाव नका घेऊ असे प्रथम वक्तव्य केले. त्यानंतर पहिले बदले घेतले जायचे पण दाखवले किंवा सांगितले जायचे नाहीत. गपचूप बदले घेतले जायचे. त्यांना नाव पाहीजे तर सांगा मी जाहीर करतो असे कित्येक बळी आत्तापर्यंत गेले आहेत असे राणे म्हणाले.

तुम्ही प्रश्न चुकीच्या माणसाकडे विचारता : अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई गोवा चौपदरी रस्त्याचे काम राखडल्याने चाकरमान्यांची गैरसोय होत असून तो रस्ता केव्हा पूर्ण होईल असा प्रश्न विचारला असता त्यांनी संगीतले की, तुम्ही प्रश्न चुकीच्या माणसाकडे विचारता इथे बांधकाम मंत्री उपस्थित आहे. या महत्त्वाकांक्षी रस्त्याच्या कामाचा कंत्राटदार पळून गेल्याने काम थांबले होते. पण आता नवीन कंत्राटदाराची नेमणूक केली असून लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे कार्य तत्पर मंत्री असल्याने या रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होईल असे सांगितले.

सत्तेसाठी तिन्ही एकत्र, पण : भारत जोडो यात्रा सुरू असून राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याविषयी वक्तव्य केले ( Rahul Gandhi offensive statement on Savarkar ) आहे. याविषयी बोलताना राणे म्हणाले, एवढे वर्ष देशात काँग्रेस सत्तेत असल्यानंतर आता त्याला भारत जोडो करावसे वाटते. हे करून यातायात स्वतःची करून घेत आहे. याच्या मागे किती लोक सामील आहेत. महाराष्ट्रात आले तरी नवीन लोक त्यांच्या सामील होत नाहीत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेस या सर्व पक्षांची मिळून भारत जोडो यात्रा सुरू आहे. पण यात्रेत ते सामील नाहीत. या तीन पक्षांची मन जुळली नाहीत, सत्तेसाठी ते फक्त एकत्र आलेले आहे आणि हे चित्र दिसुन आलं आहे. यामध्ये त्यांना फारसा यश मिळणार नाही. पंतप्रधान मोदी हे विधायक कार्य करत असून आम्हाला त्यांचा सार्थ अभिमान असल्याचे मंत्री राणे म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.