ETV Bharat / state

Thane Crime : महिलेची हत्या करणाऱ्या प्रियकराला दीड महिन्यानंतर अटक

author img

By

Published : Jan 5, 2023, 4:06 PM IST

पतीला सोडून प्रियकराशी लग्न करण्याचा निर्णय घेणाऱ्या महिलेची हत्या ( A woman is murdered by her boyfriend ) करणाऱ्या प्रियकराला दीड महिन्यानंतर अटक ( Boyfriend arrested aftermonth and half ) करण्यात आली आहे. ३७ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या ( A woman is murdered by her boyfriend ) झाल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा परिसरातील एका चाळीत घडली होती.

The boyfriend who killed the woman was arrested a month and a half later
महिलेची हत्या करणाऱ्या प्रियकराला दीड महिन्यानंतर अटक

ठाणे : नवऱ्याला सोडून प्रियकरासोबत राहणाऱ्या ३७ वर्षीय महिलेची निर्घृण हत्या ( A woman is murdered by her boyfriend ) झाल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी घडली होती. ही घटना अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा परिसरातील एका चाळीत घडली. खळबळजनक बाब म्हणजे मृत महिला ज्या व्यक्ती सोबत राहत होती, त्यानेच तिची हत्या करून पळ काढल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. याप्रकरणी हिल लाईन पोलीस ठाण्यात ( Hill Line Police Station) हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध पोलिसांनी सुरु असता, दीड महिन्यानंतर पोलिसांना आरोपीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. वैभव देवकते असे बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे. तर लक्ष्मीबाई मनोहर तायडे असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

शेजाऱ्यांना आढळून आला मृतदेह - मृत महिला दोन महिन्यापूर्वी आरोपी प्रियकर वैभव सोबत अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी फाटा भागातील साईबाबा चाळीतील भाड्याच्या घरात राहण्यास आली होती. ती मूळची अकोला जिल्ह्यातील पिंपळखुंटे गावात राहणारी होती. त्यातच मृतक महिलेने आरोपीकडे सतत लग्नाचा तगादा लावत होती. यामुळे दोघांमध्ये वादही होत होते. असाच वाद ७ नोव्हेंबर रोजी झाला होता. त्याच पहाटेच्या सुमारास तिची चाकूने गळा चिरून घरताच निर्घृण हत्या ( A woman is murdered by her boyfriend ) केली. सकाळी सात वाजल्याच्या सुमारास तिचा मृतदेह ती राहत असलेल्या घरात शेजाऱ्यांना आढळून आला. मात्र तिच्यासोबत रहाणारा वैभव पसार झाला होता.

आदी साडीने तिचा गळा आवळला, नंतर चाकूने गळयावर वार - घरात खून झालेल्या घटनेची माहिती शेजाऱ्यांनी हिललाईन पोलिसांना देताच पोलीस पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करत लक्ष्मीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उल्हासनगर मधील शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात रवाना केला. मृतदेहाच्या अहवालात आदी साडीने तिचा गळा आवळला नंतर चाकूने गळयावर वार करून तिची निर्घृण हत्या केल्याचे समोर आले. त्यानंतर हिल लाईन पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून वैभवचा पोलिसांनी तपास सुरू केला.

ॉऔरंगाबाद शहरातून दीड महिन्यानंतर अटक - तपासा दरम्यान वैभव हा याच भागातील एका बांधकाम साईटवर वाहनचालक असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी आरोपीची अधिकाअधिक माहिती गोळा करून त्याच्या शोध घेण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पडवळ , गुन्हे प्रकटीकरणं टीमचे सुभाष घाडगे , बाबू जाधव , बडे आणि प्रमोद लोंढे या पोलीस पथकाची नेमकणूक करण्यात आली. मात्र आरोपी हा वेळोवेळी राहण्याचे ठिकाण बद्दल असल्याने पोलिसांना गुंगारा देत होता. त्यातच पोलीस पथकाला गुप्त बातमीदार आणि तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी वैभव औरंगाबाद शहरात असल्याची माहिती मिळताच, पोलीस पथकाने औरंगाबाद शहरातून दीड महिन्यानंतर ताब्यात घेऊन अटक केली आहे. ह्या घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित डेरे करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.