ETV Bharat / state

Police Constable Murder : कौटुंबिक वादातून पोलीस कर्मचाऱ्याची हत्या; पत्नी व मुलीला अटक - पत्नी व मुलीकडून पोलीस कर्मचारीची हत्या

कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौक कोळसेवाडी ( Nana Pavshe Chowk Kalyan East ) परिसरात कौटुंबिक वादातून ( Family Dispute Issue ) एका पोलीस कर्मचाऱ्याची ( Police Constable Murder ) त्यांच्या पत्नी व विवाहित मुलीने हत्या केली आहे. यात दोघींनाही पोलिसांनी अटक केली आहे.

Police Constable
Police Constable
author img

By

Published : Jan 7, 2022, 4:11 PM IST

Updated : Jan 7, 2022, 5:37 PM IST

ठाणे - कौटुंबिक वादातून ( Family Dispute Issue ) पत्नी व विवाहित मुलीने पोलीस कर्मचारी ( Police Constable Murder ) असलेल्या कुटूंब प्रमुखाची डोक्यात लोखंडी बत्ताने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील नाना पावशे चौक कोळसेवाडी ( Nana Pavshe Chowk Kalyan East ) परिसरात घडली आहे. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ( Kolsewadi Police ) ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पत्नी व मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. ज्योती बोरसे (वय ४५) असे अटक केलेल्या पत्नीचे नाव आहे. तर भाग्यश्री पवार (वय २७) असे अटक केलेल्या विवाहित मुलीचे नाव आहे. तर प्रकाश बोरसे (वय ५५ ) असे मृतक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

माहिती देतांना पोलीस
  • विवाहित मुलगी नांदायला जात नसल्याने होता वाद

मृतक प्रकाश बोरसे कुटुंबासह कोळसेवाडी परिसरातील नाना पावशे चौकातील हिरा पन्ना अपार्टमेंटमधील तिसऱ्या मजल्यावर पत्नी व विवाहित मुलीसोबत राहत होते. ते कुर्ला येथील पोलीस ठाण्यात पोलीस हवालदार या पदावर कार्यरत होते. तीन वर्षांपूर्वी आरोपी मुलीचे लग्न योगेश पवार या तरुणाशी लावून दिले. मात्र काही महिन्यात सासरी वाद करून मुलगी पुन्हा माहेरी आली होती. तेव्हापासून ती माहेरीच राहत आहे. त्यामुळे मृतक वडील हे विवाहित मुलाला सासरी जाऊन नांदायला सतत सांगत होते. मात्र यावरून आरोपी पत्नी व मुलगी त्यांच्याशी वाद घालत होती. त्यातच काल रात्रीच्या सुमारास पुन्हा नांदायला जाण्याच्या वादातून कौटुंबीक हिंसाचार होऊन या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले. यावेळी मात्र वाद विकोपाला गेला कि, हाणामारीत प्रकाश यांच्या डोक्यात किचनमधील असलेल्या खलबत्ता तिला लोखंडी बत्ता पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री या दोघींनी त्यांच्या कपाळावर, तोंडावर प्रहार केला. त्या लोखंडी बत्ताने केलेल्या मारहाणीत प्रकाश बोरसे यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

  • पत्नी व मुलीला पोलीस कोठडी

जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने केलेल्या मारहाणीत प्रकाश बोरसे यांची हत्या केल्याप्रकरणी पत्नी ज्योती व मुलगी भाग्यश्री यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात भादवि ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय पोलीस अधिक तपास करत आहेत. तर आज आरोपी पत्नी व मुलगी या दोघीना न्यायालयात हजर केले असता अधिक पोलीस कोठडी सुनावली आहे.

हेही वाचा - Man Arrested Who Killed His Girlfriend : दाजीला गुन्ह्यात अडकविण्यासाठी प्रेयसीची हत्या, मेव्हुण्यास अटक

Last Updated : Jan 7, 2022, 5:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.