ETV Bharat / state

Murder News : धक्कादायक! सिगारेट आणण्यास नकार देणाऱ्या मित्राची हत्या, घटना सीसीटीव्हीत कैद - सिगारेट आणण्यास नकार देणाऱ्या मित्राची हत्या

सिगारेट आणण्यास नकार दिल्याने एका मित्राची हत्या ( Killing a friend who refused to bring cigarettes ) करण्यात आलीत आली आहे. डोंबिवली पूर्वेकडील पेंडसेनगर भागातील ( Murder in Pendsenagar area ) एका सोसायटीच्या गेटवर घडली आहे. घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कैद झाला असून याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

Murder
Murder
author img

By

Published : Nov 12, 2022, 7:28 PM IST

ठाणे : पान टपरीवरून सिगारेट आणून देण्यास नकार देणाऱ्या मित्राचा भिंतीवर डोके आपटून खून ( Murder ) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना डोंबिवली पूर्वेकडील पेंडसेनगर भागातील ( Murder in Pendsenagar area ) एका सोसायटीच्या गेटवर घडली आहे. या घटनेचा प्रकार सीसीटीव्ही कैद झाला असून याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात खून ( Killing a friend who refused to bring cigarettes ) करणाऱ्या मित्रासह त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. हरिशचंद्र उर्फ बकुळ रामदास चौधरी ( वय, ३२ रा. चोळेगाव ठाकुर्ली ) असे अटक केलेल्या मित्राचे नाव आहे. तर जयेश देवजी जाधव (वय ३८) असे खून झालेल्या मित्राचे नाव आहे.

सिगारेट आणण्यास नकार देणाऱ्या मित्राची हत्या

दारूच्या नशेत मारहाण- मृत जयेश हा डोंबिवली पूर्वेतील पेंडसेंनगर भागातील तुषार सोसायटीत कुटंबासह राहत होता. आरोपी हरिशचंद्र आणि मृत जयेश दोघेही मित्र असून ४ नोव्हेंबर रोजी दुपारी दोघांनी दारूची पार्टी एका मित्रासोबत केली होती. त्यानंतर जयेश राहत असलेल्या सोसायटीच्या गेटवर घरी जाण्यासाठी आला असता, त्याला आरोपी मित्राने पैसे देत पान टपरीवरून सिगारेट आणण्यास सांगितले. मात्र मृत जयेशने सिगारेट आणण्यास नकार दिला. त्यामुळे आरोपी आणि त्याच्या एका साथीदाराने मृतक जयेशला दारूच्या नशेत मारहाण करत त्याचे डोके सोसायटीच्या भिंती आपटले, हा सर्व प्रकार सोसायटीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता.

शवविच्छदेनानंतर खुनाचा प्रकार - मृतक जयेशला मारहाणीत डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. मात्र त्यावेळी मृत जयेशला जाणवले नसल्याने तो घरी जाऊन झोपला. त्यानंतर त्याच्या बहिणीनं त्याला झोपेतून उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो बेशुद्ध झाल्याने त्याला तातडीने ठाण्यातील कळवा रुग्णालयात दाखल केलं. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे जयेशचा डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाल्याचे त्याच्या शवविच्छदेन अहवाल आल्यानंतर खुनाचा प्रकार समोर आला. तर दुसरीकडे घटनेची दिवशी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, जयेशला त्याचे मित्र मारहाण करताना दिसले.

आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी - त्यानंतर मृतकची बहीण सुषमा जाधव (४२) यांच्या तक्रारीवरून हरिशचंद्र व त्याच्या साथीदारावर भादवी कलम ३०२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल आरोपी मित्राला अटक केली आहे. तर कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात आज दुपारी आरोपीला न्यायालयात हजर केले असता ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.