ETV Bharat / state

'एमएमआर रीजनमधील सर्व खाजगी आणि सरकारी रुग्णालयाचे फायर ऑडिट करा' - रुग्णालयाचे फायर ऑडिट करण्याचे एकनाथ शिंदेंचे आदेश

सर्व महानगरपालिकाच्या अखत्यारितील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

eknath shinde statement on fire audit
eknath shinde statement on fire audit
author img

By

Published : Apr 27, 2021, 9:16 PM IST

ठाणे - एमएमआर रीजनमधील सर्व महानगरपालिकाच्या अखत्यारितील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. सध्या वाढत असलेल्या आगीच्या घटना टाळण्यासाठी हे ऑडिट त्रयस्थ तज्ञ संस्थेच्या माध्यमातून करा, असे त्यांनी आदेशात म्हटले आहे.

प्रतिक्रिया

कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक -

एमएमआर रीजनमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज नगरविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत व्हीसीद्वारे बैठक पार पडली. यावेळी ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. तसेच यावेळी ऑक्सिजन, रेमडेसिवीर उपलब्धतेचाही आढावा घेण्यात आला. त्यासोबतच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची विचारपूस करण्यासाठी तसेच त्यांच्या तब्येतीची माहिती मिळवण्यासाठी कॉल सेंटरचा प्रभावी वापर करण्याची सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.

कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी फायर ब्रिगेड तैनात -

उन्हाळा सुरु झाल्याने एसी आणि व्हेंटिलेटर यामुळे अतिरिक्त वीज वापरली जाते. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आगी लागण्याची शक्यता असल्याने कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी फायर ब्रिगेड तैनात करण्याच्या सूचना त्यांनी केली. यासोबतच अनेकदा रात्री अपरात्री खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. या घटना टाळण्यासाठी सहाय्यक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर यांच्या मदतीने या ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवणे आणि ऑक्सिजन कमी होताच पालिकेला कळवणे बंधनकारक करण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच कोविड केअर सेंटरमधील महिला रुग्णांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दक्ष राहण्याचे आदेशदेखील त्यांनी यांनी दिले.

ऑक्सिजन प्लांट लवकरात लवकर लावा -

एमएमआर रीजनमधील काही महानगरपालिकांच्या भागातील करोना रुग्णाची संख्या घटत असल्याचे निरीक्षण काही महापालिका आयुक्तांनी नोंदवले. मात्र, तरीही ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे काम शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करून हे प्लांट कार्यान्वित करण्याचे निर्देशदेखील त्यांनी सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

हेही वाचा - राहुल गांधी यांच्यावर विडंबनात्मक जाहिरात; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून कंपनीच्या कार्यालयाची अंधेरीत तोडफोड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.