ठाणे - सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायजर वापराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेच्या पथकाने सलग दुसऱ्या दिवशीही कारवाई करीत शहरातील ५ बार व १ वाईन शॉप सील केले. महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून शहरात कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच ठेवण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
या ठिकाणी झाली कारवाई
या कारवाईअंतर्गत वागळे प्रभाग समितीमधील धमाल बार अॅन्ड रेस्टॉरंट सहायक आयुक्त विजयकुमार जाधव यांनी सील केला. वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत सुरसंगीत बार अॅन्ड रेस्टॉरंट, स्वागत बार अॅन्ड रेस्टॉरंट आणि नक्षत्र बार अॅन्ड रेस्टॉरंट हे तीन बार आणि रेस्टॉरंटस सहाय्यक बाळासाहेब चव्हाण यांनी सील केले. मुंब्रा प्रभाग समिती मधील १ रेस्टॉरंट सहाय्यक आयुक्त सागर सांळुंखे, तर लोकमान्य सावरकर प्रभाग समिती मधील पांडुरंग वाईन शॉप सहायक आयुक्त कल्पित पिंपळे यांनी सील केले. सर्व कारवाया अतिक्रमण व निष्कासन विभागाचे उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या.