ठाणे - गिर्यारोहक अंजली कुलकर्णी यांचा एव्हरेस्ट मोहिमेत मृत्यू झाला. या मृत्यूला सर्वस्वी एवरेस्टवर झालेली गर्दी म्हणजेच ट्रॅफिक जॅमच जबाबदार आहे, असे त्यांचा मुलगा शंतनू कुलकर्णीने ईटीव्ही भारतसोबत बोलताना सांगितले.
एव्हरेस्ट सर करण्यापासून त्यावे केवळ 50 मीटर दूर असतानाच त्यांच्याजवळील ऑक्सिजन संपला होता. गर्दीमुळे त्यांना नवीन ऑक्सिजनही देता आला नाही. म्हणूनच स्वतःच्या डोळ्यांसमोरच आपल्या बायकोला मरताना शरद कुलकर्णी यांना पाहावे लागले. मदतीसाठी भीक मागूनही कोणी त्यांना मदत केली नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
परवाने देताना काही परवान्यांवर बंदी आणावी. त्यासाठी वेगळी नियमावली तयार करावी. जेणेकरून पुढील वर्षी यासारखी दुर्घटना होणार नाही. यासाठी नेपाळ सरकारने शक्य ते सगळे प्रयत्न करावे, अशी विनंती शंतनू कुलकर्णी यांनी ईटीव्ही भारतसोबत बोलताना केली.