ETV Bharat / state

मुंबईतून भिवंडीत आलेल्या आईसह दोन मुलांना कोरोनाची लागण; पोलिसांची नाकाबंदी फोल.. - latest corona update bhiwandi

भिवंडी शहरात आतापर्यंत १० रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना प्रवासाचा इतिहास आहे. त्यामुळे शहरात बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश नाही म्हणणाऱ्या पोलिसांची नाकाबंदी दिखाव्याची ठरल्याचे दिसून येत आहे.

भिवंडी
भिवंडी
author img

By

Published : Apr 24, 2020, 7:13 PM IST

ठाणे - भिवंडी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून शहरात आतापर्यंत १० रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व रुग्णांना प्रवासाचा इतिहास आहे. त्यामुळे शहरात बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश नाही म्हणणाऱ्या पोलिसांची नाकाबंदी दिखाव्याची ठरल्याचे दिसून येत आहे.

मुंबईतील दहिसर पूर्व येथे महिला एक महिना माहेरी वास्तव्य करून 15 एप्रिलला भिवंडी शहरातील तांडेल मोहल्ला येथे सासरी आपल्या दोन मुलांसोबत परतली. याची माहिती भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागास मिळताच, या तिघांचे विलगीकरण करून त्यांचे 'स्वॅब' नमुने तपासणीसाठी हाफकीन इन्स्टिट्यूट या ठिकाणी पाठविले. यात 30 वर्षीय महिला, तिचा 12 वर्षाचा मुलगा व 2 वर्षाची मुलगी या तिघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्या अतिनिकट संपर्कातील 7 जणांना टाटा आमंत्रण येथील विलगीकरण कक्षात दाखल केले असल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली.

या तिघांव्यतिरिक्त वडाळा येथील महिला आपल्या तीन मुलांना घेऊन भिवंडी शहरातील गुलजारनगर येथे माहेरी 19 एप्रिलला आली होती. त्यांचेही विलगीकरण केल्यावर त्यापैकी 7 वर्षीय मुलगी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली असून तिच्या अतिनिकट संपर्कात आलेल्या दोन व्यक्तींनासुध्दा टाटा आमंत्रण येथील विलगीकरण कक्षात दाखल केले आहे.

दरम्यान, शुक्रवारी आढळून आलेल्या 3 रुग्णांमुळे भिवंडी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 10 वर पोहचली असून त्यांच्यावर स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती कोव्हिड-19 रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या रुग्णांची नोंद मूळ वास्तव्याचे ठिकाण मुंबई येथे होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे.

भिवंडी शहरात आढळलेल्या 10 रुग्णांना प्रवासाचा इतिहास असून हे सर्व रुग्ण बाहेर गावाहून भिवंडी शहरात आल्यावर कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहेत. त्यामुळे शहराची केलेली नाकाबंदी व त्यासाठी चोवीस तास असलेला पोलीस बंदोबस्त हा फोल ठरत असल्याचे बोलले जात आहे. या रुग्णांना शहराबाहेरच रोखले असते, तर शहरात एकही रुग्ण आढळून आला नसता अशी चर्चा नागरिक करताना दिसत आहेत.

या व्यतिरिक्त माहीम येथील पति-पत्नी आणि वडाळा येथील एक असे 3 रुग्ण हे मूळचे मुंबई येथील असून ते भिवंडी शहरातील नातेवाईकांकडे आले असता त्यांची वेळीच माहिती महानगरपालिका आरोग्य विभागास कळल्याने या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन तपासणी केल्याने पुढील संसर्ग टाळता आल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.