ETV Bharat / state

ठाणे स्थानकात ऐतिहासिक वाफेच्या इंजिनचे स्मारक; ठाणेकरांची साद, रेल्वेचा प्रतिसाद - ठाणे रेल्वे स्थानकात जुने इंजिन स्मारक

ठाणे रेल्वे स्थानकात तब्बल 100 वर्ष् जुने ब्रिटिश कालीन वाफेच इंजिन बसवण्यात आले आहे. रेल्वेने ठाणेकरांची याबाबतची मागणी मान्य केली आहे.

thane railway
ठाणे रेल्वे
author img

By

Published : Apr 2, 2021, 10:37 AM IST

ठाणे : ऐतिहासिक रेल्वेस्थानक म्हणून ठाणे स्थानकाचा गौरव होतो. देशभरातील प्रमुख स्थानकाच्या तुलनेत ठाणे स्थानक नगण्य दिसत होते. त्यामुळे स्थानकाचा इतिहास सर्वाना कळावा यासाठी येथे एखादे स्मारक बनवण्याच्या मागणीने जोर धरला. त्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकून तब्बल 100 वर्ष जुने ब्रिटिश कालीन वाफेच इंजिन ठाणे स्थानकातील प्लँटफॉर्म क्रमांक 1 च्या बाहेर ठेवले आहे. त्यामुळे ठाणेकरांसाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट झाली आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात उभारले जुन्या इंजिनचे स्मारक

ठाणेकरांची साद, रेल्वेचा प्रतिसाद

भारतात १६ एप्रिल १८५३ साली पहिली रेल्वे वाडीबंदर ते ठाणे स्थांनकादरम्यान धावली होती. त्यानंतर देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वेचा विस्तार वाढत गेला. मात्र, ठाणे स्थानकाकडे कोणी गांभीर्याने बघीतले नाही. त्यातच ठाणे शहराचा हळूहळू चेहरामोहरा बदलत गेला. मात्र, ठाणे स्थानकात रेल्वेच्या जुन्या कोणत्याच पाऊलखुणा नव्हत्या. गेल्यावर्षी ठाणे पूर्वेतील विसर्जन घाट रस्त्यावर खोदकाम करताना जुने रूळ दिसून आले. त्याचवेळी ठाणेकरांनी हे रूळ काढून ब्रिटिश कालीन रेल्वे इंजिन आणि दोन डबे आणून स्मारक करावे, अशी मागणी केली होती. या मागणीचा रेल्वेने सकारात्मक विचार केला. त्यानुसार, प्लँटफॉर्म क्रमांक 1 च्या बाहेर ऐतिहासिक जुने इंजिन लावले आहे. लवकरच रेल्वेचा सर्व इतिहास ठाणेकरांना बघायला मिळणार आहे.

काय आहे ठाणे स्थानकाचा इतिहास ?
ठाणे स्थानकातील प्लँटफॉर्म क्रमांक १ च्या बाहेर बुधवारी रात्री १८९७ साली मिरज ते लातूर या (३२५ किमी) दरम्यान धावलेले वाफेच इंजिन बसवण्यात आले होते. ब्रिटिश अभियंता एव्हरार्ड रिचर्ड कॅलथोर्प यांनी तयार केलेल्या दोन फूट सहा इंच लांबीच्या अरुंद बार्शी लाईट पद्धतीच्या रेल्वे रुळावर हे इंजिन वापरण्यात आले होते. अरुंद रुळावरून संथ गतीने धावणाऱ्या इंजिनला सात लाकडे असावीत, अशी माहिती रेल्वे सूत्राने दिली. ब्रिटिश कालीन इंजिनची प्रतिकृती बसवल्यामुळे रेल्वेचा जुना इतिहास लगेचच डोळ्यासमोर येणार आहे.

१६ एप्रिलला या इंजिन स्मारकाचे उद्घाटन ?

रेल्वे प्रवासी संघटनांकडून १६ एप्रिलला रेल्वेचा वाढदिवस साजरा केला जात असताना ठाणे स्थानकात ऐतिहासिक इंजिनच्या स्मारकाची मागणी सातत्याने लावून धरली जात होती. १६ एप्रिलला या इंजिन स्मारकाचे उद्घाटन होण्याची शक्यता रेल्वे सूत्रांनी व्यक्त केली. आमदार केळकर यांनी या स्मारक उभारणीबद्दल समाधान व्यक्त केले, तर प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख यांनी रेल्वेचे आभार मानले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.