ETV Bharat / state

Bullock Cart Race : बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधूंद गोळीबार ; ३३ आरोपींना मोक्का - बैलगाडा शर्यत ठाणे

बैलगाडा शर्यतीच्या वादातून दोन गटात अंदाधूंद गोळीबार झाल्याची घटना (fired in bullock cart race) अंबरनाथ पूर्वेतील आनंदनगर एमआयडीसी भागातील रस्त्यावर १३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. यामधील १० आरोपींना पोलिसांनी अटक केली. दोन गटातील गोळीबार प्रकरणातील ३३ आरोपींना मोक्का लावण्यात आला (Mokka to 33 accused bullock cart race) आहे.

Bullock Cart Race
बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधूंद गोळीबार
author img

By

Published : Nov 22, 2022, 7:56 AM IST

ठाणे : बैलगाडा शर्यतीच्या वादातून दोन गटात अंदाधूंद गोळीबार झाल्याची घटना (fired in bullock cart race) अंबरनाथ पूर्वेतील आनंदनगर एमआयडीसी भागातील रस्त्यावर १३ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली होती. यामधील १० आरोपींना पोलिसांनी अटक केली. दोन गटातील गोळीबार प्रकरणातील ३३ आरोपींना मोक्का लावण्यात आला (Mokka to 33 accused bullock cart race) आहे. अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी अटक आरोपीसह फरार असलेल्या ३३ आरोपींवर मोक्का कलमांतर्गतक कारवाई करण्यासाठी परवानगी दिली आहे.

वाहन अडवून गोळीबार : अंबरनाथ तालुक्यातील बोहनोली गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले. त्यावर चर्चेसाठी राहुल पाटील हे त्यांचे सहकाऱ्यांसह खाजगी वाहनातून जात असताना अंबरनाथ पूर्वेतील सुदामा हॉटेल आणि एमआयडीसी कार्यालयासमोर रस्त्यावर गुरुनाथ पंढरीनाथ फडके, पंढरीनाथ जगन फडके आणि त्यांच्या साथीदारांनी पाटील यांचे वाहन अडवून त्यांच्यावर गोळीबार केला होता. गोळया झाडुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीसोबत असलेल्या इतर वाहनांची मोडतोड केली म्हणुन गुरूनाथ पंढरीनाथ फडके, पंढरीनाथ जगन फडके आणि त्यांच्या साथीदारांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला (bullock cart race dispute in Thane) होता.

बैलगाडा शर्यतीच्या वादातून अंधाधूंद गोळीबार ; ३३ आरोपींना मोक्का

जिवे ठार मारण्याचा प्रयत्न : याप्रकरणी मुख्य सूत्रधार गुरुनाथ पंढरीनाथ फडके आणि त्याचे साथीदार यांनी राजकीय व गुन्हेगारी वर्चस्व निर्माण करण्याकरीता अग्निशस्त्र, प्राणघातक हत्यारांसह सातत्याने गैरकायदयाची मंडळी जमवुन बेकायदेशिरपणे कृत्य करून संघटीतपणे हिंसाचाराचा अवलंब करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते. तसेच नवी मुंबई, रायगड, ठाणे परिसरात गंभिर स्वरूपाचे ज्यात जिवे ठार मारण्याचा प्रयत्न, धमकावणे, शिवीगाळ व मारहाण करणे या स्वरूपाचे गुन्हे सातत्याने केले असल्याचेही पोलिसांच्या समोर आले (accused who fired in bullock cart race) होते.

गैरकृत्यांना आळा : या टोळीच्या गैरकृत्यांना आळा घालणेकरीता प्रचलीत कायदयान्वये त्यांचेविरुध्द वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांचे वर्तनात सुधारणा झालेली नाही, असे पोलिसांनी आपल्या अहवालात म्हटले होते. त्यामुळे याप्रकरणी मोक्का कलमांतर्गत कारवाईची मागणी स्थानिक पोलिसांनी केली होती. त्यानुसार या ३३ आरोपींच्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मोक्का अन्वये कारवाई करण्याची पूर्व मंजुरी दिल्याने या गुन्ह्यातील आरोपींवर कायदाचा फास घट्ट आवळला जाणार (bullock cart race) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.