ठाणे - व्यापाऱ्याला ५ लाखांच्या खंडणीसाठी धमकावत त्याच्यावर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी आधारवाडी कारागृहात शिक्षा भोगत असलेला कल्याण पश्चिमेकडील भाजपाचा माजी नगरसेवक सचिन खेमा याच्यावर मोक्का ( Mocca Register On Ex-BJP Corporator Sachin Khema ) अंतर्गत कारवाई केली असल्याची माहिती कल्याण विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांनी दिली आहे. मात्र, या कारवाईने भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे.
माजी नगरसेवक सध्या आधारवाडी कारागृहात बंदिस्त -
विशेष म्हणजे माजी नगरसेवक सचिन खेमावर यापूर्वीही गंभीर गुन्ह्याची जंत्री पाहता ही कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. भाजपा माजी नगरसेवक सचिन खेमा हा कल्याण रेल्वे स्थानक भागातील नगरसवेक होता. त्याने कल्याणमधील छत्री व पतंगाचे व्यापारी अमजद सय्यद याला ५ लाखांच्या खंडणीसाठी धमकावत त्याच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलिसांनी सचिन खेमा याला गेल्याच आठवड्यात अटक केली. तेव्हापासून तो आणि त्याचे साथीदार आधारवाडी कारागृहात बंदिस्त आहेत.
त्यामुळे भाजपचे सर्व प्रयत्न निष्फळ -
विशेष म्हणजे गुन्हेगार असलेल्या सचिनच्या सुटकेसाठी भाजपा नेत्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत त्याच्यावर पोलिसांनी खोट्या गुन्हयात गोवल्याचे सांगत शनिवारी पोलीस अप्पर आयुक्तांच्या कार्यलयावर मोर्चा काढण्याचे जाहीर केले. मात्र, पोलिसांनी त्यांना मोर्च्याची परवानगी नाकारून जर जबरदस्ती मोर्चा काढण्यास कारवाई केली जाईल, अशा नोटीस बजावल्या होत्या. त्यामुळे कोणीच भाजप नेता पुढे आला नाही, त्यामुळे भाजपचे हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. पोलिसांनी सचिन खेमा याच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केलीच. या कारवाईनंतर गुन्हेगार प्रवृत्तीचा भाजपा माजी नगरसेवक सचिन खेमाची सुटका होणे अवघड असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
हेही वाचा - Kirit Somaiya Criticized Sanjay Raut : 'संजय राऊत कुटुंबाची वाईनरीमध्ये पार्टनरशिप'