नवी मुंबई - कोविड-19 काळात नागरिकांना मोठ्या आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यात महावितरण विभागाने बिल न भरल्याने वीज पुरवठा खंडीत केला. त्यामुळे याचा जाब विचारला असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने मनसेने नेरुळ नवी मुंबईतील महावितरण कार्यालयालयाची तोडफोड केली.
वाढीव वीज बिल आले असताना, वीज बिल न भरल्याने महावितरणने वीज जोडणी तोडली. यामुळे वीज जोडणी का तोडली याचा जाब मनसेच्या माध्यमातून महावितरणच्या अधिकाऱ्यांना विचारले असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने राग अनावर होऊन मनसे नवी मुंबईचे शाखा अध्यक्ष नरेश कुंभार यांनी महावितरणचे नेरुळ सेक्टर-३ येथील कार्यालयाची तोडफोड केली.
कोविड-१९ काळात लोकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत असताना महावितरण जर अशी दादागिरी करत असेल तर महावितरणला नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागणार, असेही मनसेने म्हटले आहे. या घटनेनंतर नेरुळ पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - भिवंडी जिलानी इमारत दुर्घटना : मृतांच्या नातेवाईकांना तीन लाखांची मदत
हेही वाचा - वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी उल्हासनगरात तृतीयपंथी तर, कल्याणात बाल गणेश रस्त्यावर