ETV Bharat / state

MNS Will Protest : राहुल गांधी यांच्या सभेत मनसे करणार राडा ; गनिमी काव्याने शेगावकडे रवाना

author img

By

Published : Nov 18, 2022, 7:02 AM IST

राहुल गांधी यांची शेगाव येथील सभा उधळून लावण्याचा निर्णय मनसेने घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra in Shegaon) आहे. मनसे नेता संदीप देशपांडे, ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवसह असंख्य मनसे कार्यकर्ते गनिमी काव्याने शेगाव येथील सभेत जाऊन मनसे स्टाईलने निषेध नोंदवतील, असा निर्धार देशपांडे यांनी बोलून (MNS protest in meeting of Rahul Gandhi in Shegaon) दाखवला.

MNS will protest in meeting of Rahul Gandhi
राहुल गांधी यांच्या शेगांव येथील सभेत मनसे करणार राडा

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अपमानजनक वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांची शेगाव येथील सभा उधळून लावण्याचा निर्णय मनसेने घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra in Shegaon) आहे. मनसे नेते संदीप देशपांडे, ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधवसह असंख्य मनसे कार्यकर्ते गनिमी काव्याने शेगाव येथील सभेत जाऊन मनसे स्टाईलने निषेध नोंदवतील असा निर्धार देशपांडे यांनी बोलून (MNS protest in meeting of Rahul Gandhi in Shegaon) दाखवला.

आंदोलनाचा पवित्रा : वीर सावरकर यांच्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेदरम्यान हिंगोली येथील सभेत अपमान जनक वक्तव्य केल्याने मनसेने देखील त्यांच्या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. राहुल गांधी यांच्या शेगाव येथील सभेत पोहचून त्यांना समजेल, अशा भाषेत मनसे स्टाईलने धडा शिकवणार असल्याचा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला. राहुल गांधी यांनी अत्यंत संतापजनक विधान केल्यानंतर देखील शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी त्यांची गळाभेट घेऊन भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेतला. याबद्दल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर टीका (MNS will protest in meeting of Rahul Gandhi) केली.

पोलीस प्रशासन सतर्क : प्रत्येक विषयावर भाष्य करणारे संजय राऊत या विषयात मौन का पाळून आहेत ? याबद्दल देखील त्यांनी प्रश्न विचारला. संदीप देशपांडे यांच्या इशाऱ्यानंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले असून त्यांना अडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील तरीदेखील गनिमी काव्याने महाराष्ट्रभरातील मनसैनिक शेगाव येथील सभेत पोहोचून त्या सभेत मनसे स्टाईलने निषेध नोंदवतील, असा इशारा त्यांनी दिला. ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मोठमोठ्या लोकांना धडा शिकविला असूनही राहुल गांधी यांना देखील त्यांची जागा दाखवून दिली जाईल, असेही त्यांनी (Rahul Gandhi Bharat Jodo Yatra) सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.