ठाणे - ओवळा-माजिवडा विधानसभेच्या मनसैनिकांनी मनसेच्या १४ व्या वर्धापन दिनानिमित्त बांगलादेशी घुसखोरांच्या प्रतिमेचा केक कापला. यावेळी घुसखोरांविरोधात घोषणा देत त्यांचा निषेध करण्यात आला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महिन्याभरापूर्वी बांगलादेशी, नायजेरियन आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात आवाज उठवला होता. त्यामुळे आज मनसैनिकांनी देखील घुसखोरांच्या प्रतिमेचा केक कापत त्यांना निषेध केला. त्या केकवर 'बांगलादेशी घुसखोरांचा नाश, हाच महाराष्ट्र सैनिकांचा ध्यास', असा संदेश लिहिला होता. यावेळी सेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे, उपशहराध्यक्ष पुष्कराज विचारे, प्रभाग अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर उपस्थित होते.