ETV Bharat / state

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ठाण्यातील भिंतीशिल्पावरून वाद; मनसे आक्रमक

ठाण्यातील सावरकर नगर येथील आई माता चौकात महापुरुष वि. दा. सावरकर यांचे भिंतीशिल्प पालिका आणि स्थानिक नगरसेवकांनी निविदा काढून उभारण्यात आले होते.

thane mns
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ठाण्यातील भिंतीशिल्पावरून वाद
author img

By

Published : Oct 6, 2020, 4:53 PM IST

ठाणे - ठाण्यातील सावरकर नगर येथील चौकातील शौचालयाजवळ वि. दा. सावरकर यांचे भिंतीशिल्प चिटकवण्यात आले आहे. त्यामुळे मनसेने याबाबत निषेध व्यक्त केला आहे.

राजेंद्र कांबळे - मनसे, शाखाध्यक्ष, ठाणे

ठाण्यातील सावरकर नगर येथील आई माता चौकात महापुरुष वि. दा. सावरकर यांचे भिंतीशिल्प पालिका आणि स्थानिक नगरसेवकांनी निविदा काढून उभारण्यात आले होते. या शिलामुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे. सुशोभिकरणाच्या नावे त्याठिकाणी भिंतीवर स्वातंञ्यावीर वि. दा. सावरकर यांचे भिंतीशिल्प लावण्यात आले असून, प्रथमदर्शनी पाहता सार्वजनिक शौचालयाच्या बाजूला अशा प्रकारे महापुरुषांच्या प्रतिमेचे भिंतीशिल्प साकारणे म्हणजे एकप्रकारे अशा महापुरुषांची विटंबनाच नाही का?असा सवाल मनसेने केला आहे . तर, दुसरीकडे वि. दा. सावरकर हे हिंदुस्थानची अस्मिता असून, त्यांची अशा प्रकारची विटंबना एक सावरकरप्रेमी म्हणून आम्ही कदापी सहन करणार नाही. महापुरुषांची अशाप्रकारे विटंबना होत असल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रकल्पाला जाहीर विरोध व निषेध करत असल्याचे मनसेच्यावतीने सांगण्यात आले आहे .

पालिकेने याबाबत तातडीने लक्ष घालून, भविष्यात कोणत्याही प्रकारे महापुरुषांचा अपमान अथवा विटंबना होणार नाही, याबाबचे आदेश देऊन, सदर प्रकल्प रद्द करावा, असे पत्र मनसेच्यावतीने ठाणे महापालिकेला दिले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.