ETV Bharat / state

MNS Warning Against Hawkers : दिवसाला तीन लाख रुपये हफ्ता! यामुळे फेरीवाला फोफावला, पण यापुढे ..? आमदार राजू पाटील यांचा अंतिम इशारा

मनसे आमदार राजू पाटील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झाले आहे. फेरीवाल्यांकडून दिवसाला तीन लाख रूपये हप्ता गोळा केल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामुळे त्यांच्याविरोधात कारवाई केली नाही तर मनसे स्टाईलने फेरीवाला मुक्त परिसर करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.

MNS Warning Against Hawkers
फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक
author img

By

Published : Mar 29, 2023, 10:20 PM IST

Updated : Mar 30, 2023, 7:05 AM IST

आमदार राजू पाटील यांचा अंतिम इशारा

ठाणे : डोंबिवली रेल्वे स्थानक परिसरातील शेकडो फेरीवाल्याकडून दिवसाला तीन लाख रुपये हप्ता गोळा केला जात असल्याचा आरोप मनसे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. तसेच फेरीवाल्यांपासून गोळा केला जाणारा हप्ता खालपासून वरपर्यंत पोचविला जात असल्याचे खबळजनक विधान आमदार राजू पाटील यांनी केले. शिवाय रेल्वे स्थानक परिसरात एकही फेरीवाला दिसणारा नाही. यासाठी मनसे स्टाईलने कायमच दक्ष राहून फेरीवाला मुक्त परिसर करण्याचा निर्धार आमदार राजू पाटील यांनी केला आहे.

फेरीवाल्यांविरोधात मनसे आक्रमक : मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महापालीका प्रशासनाला रेल्वे स्थानक परिसर फेरीवाला मुक्त करण्यासाठी दिवसांची मुदत दिली होती. मात्र दोन दिवसापूर्वी ती मुदत संपली आहे. तरी देखील फेरीवाला जैसे थे असल्याने डोंबिवलीमधील फेरीवाल्याविरोधात मनसे आमदार राजू पाटील हे आक्रमक होऊन रस्त्यावर उतरले आहे.

तिघेही आमच्या टार्गेटवर : कल्याण डोंबिवलीत फेरीवाल्यांनी फुटपाथसह काही ठीकाणी रस्तावरच बस्थान मांडून फेरीवाले बसल्याचे पाहवयास मिळत आहे. यामुळेच फेरीवाल्यांना स्टेशन परिसरात गर्दी करत वाहतुकीला अडथळा करण्यास रान मोकळे झाले आहे. मात्र यापुढे केवळ फेरीवालाचाच विषय नाही तर मुजोर रिक्षावाले आणि दुकानदार जे फुटपाथवर कब्जा करून आपला व्यवसाय करीत आहेत. हे तिघेही आमच्या टार्गेटवर असल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

पालिका आयुक्तांची घेणार भेट : आज काही रिक्षा संघटना, फेरीवाले संघटना, पालिका अधिकारी, रेल्वे पोलीस, स्थानिक वाहतूक पोलीस यांच्यासोबत डोबिवली रेल्वे स्थानक परिसरात पाहणी करण्यासाठी आल्याचे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. मात्र, मी येणार असल्याने आज सकाळपासूनच हा परिसर सध्या तरी पालिका अधिकाऱ्यांनी फेरीवाला मुक्त केला. पण अशीच कारवाई त्यांनी अखेरपर्यत सुरु ठेवावी, जेणे करून नागरिकांना रस्ता व फुटपाथवरून चालण्याची सुविधा मिळेल. तर कारवाई सातत्याने सुरु ठेवावी यासाठी पालिका आयुक्तांची येत्या दोन दिवसात भेट घेणार असल्याचेही आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

खासदार शिंदेंना सल्ला : खासदार शिंदेंनी मतदारसंघात असलेल्या समस्यांकडे लक्ष द्यावे. आमदार राजू पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदेंनी कोल्हापूरचा रस्ता खराब झाल्याने तेथील अधिकाऱ्याला झापले असे खासदार शिंदे भाषणात सांगत आहे. फेरीवाला मुद्यावरून आमदार राजू पाटील यांनी सल्ला वजा टोमणाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंना लगावला आहे. आमदार पाटील म्हणाले की, खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंच्या मतदारसंघात बदलापूर येत नाही. तरी देखील तिकडे लक्ष देतात, मात्र त्यांच्या मतदारसंघात असलेल्या डोंबविली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, कोपर, दिवा या रेल्वे स्थानकांची व परिसरातील समस्यांकडे त्यांनी लक्ष द्यावे, असा सल्ला आमदार राजू पाटील यांनी खासदार शिंदेंना दिला.

फेरीवाल्यांनी काढला पळ : मनसेने दिलेली मुदत संपल्यानंतर मनसेने कालपासूनच स्टेशन परिसरात आता आमच्याकडे दुर्लक्ष करा अशा आशयाचे बॅनर लावून फेरीवाल्यांविरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे. रेल्वे स्टेशन परिसराच्या 150 मीटरच्या परिसरात फेरीवाले असू नये असा आदेश न्यायालयाचा आहे. मात्र, तरीसुद्धा महापालिका प्रशासन कारवाई करत नसल्याने आता मनसे आपल्या पद्धतीने स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करेल, असा इशारा मनसेने दिला होता. त्यामुळे फेरीवाल्याविरोधात खळखट्याक आंदोलनच्या भीतीने बुधवारी फेरीवाल्यांनी पळ काढला होता.

हेही वाचा : Vaibhav Kadam Suicide Case : जितेंद्र आव्हाड अडचणीत येण्याची शक्यता; माजी बॉडीगार्ड वैभव कदमांच्या आत्महत्येवरून संशय

Last Updated : Mar 30, 2023, 7:05 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.