ETV Bharat / state

कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या डोंबिवलीतून २५ तबलिगींना बाहेर काढण्याची मनसेची मागणी

आधीच कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या डोंबिवलीत तबलिगी जमातमधील व्यक्ती इथे राहण्याने जर नागरिकांमध्ये भीती निर्माण होत असेल आणि त्यामुळे भविष्यात प्रशासनावर ताण येणार असेल तर या त्यांना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर हलवावे. तसेच पूर्वीच्या ठिकाणी क्वारंटाईन करावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीटरद्वारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना केली

mns mla raju patil demanded tablighis 25 people shift to the other place
कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या डोंबिवलीतून २५ तबलिगींना बाहेर काढण्याची मनसेची मागणी
author img

By

Published : Apr 21, 2020, 4:50 PM IST

Updated : Apr 21, 2020, 5:01 PM IST

ठाणे - कोरोना आजाराचे हॉटस्पॉट ठरलेल्या डोंबिवलीत २५ तबलिगी जमातमधील व्यक्तींना ठेवण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यांना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर काढण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांची ट्वीटरद्वारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेकडे केली असून, पालिका आयुक्तांनाही लेखी पत्राद्वार मागणी केली आहे.

कल्याणमधील बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काही दिवसापूर्वी दिल्लीच्या मरकझ कार्यक्रमातून आलेल्या २५ तबलिगी जमातमधील व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेऊन कल्याण-भिवंडी रस्त्यावरील राजणोली नाक्यावर असलेल्या क्वारंटाईन केंद्रात दाखल करण्यात आले होते. या ठिकाणी १४ दिवसानंतर त्यांची कोरोना आजाराची तपासणी केली असता, या सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला होता. त्यानंतर या सर्वाना डोंबिवलीतील बीएसयुपीच्या इमारतीत ठेवण्यात आले. मात्र, आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांना ही माहिती मीळाल्यावर चिंतेचे वातावरण पसरले आहे.

आधीच कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या डोंबिवलीत तबलिगी जमातमधील व्यक्ती इथे राहण्याने जर नागरिकांमध्ये भीती निर्माण होत असेल आणि त्यामुळे भविष्यात प्रशासनावर ताण येणार असेल तर या त्यांना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर हलवावे. तसेच पूर्वीच्या ठिकाणी क्वारंटाईन करावे, अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीटरद्वारे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना केली असून पालिका आयुक्तांनाही लेखी पत्राद्वारे मागणी केली आहे.

आमदार पाटील यांनी पालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रातील मुद्दे -

कोरोनाबाधित रूग्ण सापडण्यात कल्याण डोंबिवलीचा महाराष्ट्रात तिसरा किंवा चौथा क्रमांक लागत आहे. आपल्या इथे हा रोग पसरण्यासाठी इथे नाममात्र असलेली आरोग्यसेवा तसेच काही लोकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे. आपण नुकतीच केडिएमसीचे आयुक्त म्हणून सुत्र हाती घेतली असली, तरीही आपण या परिस्थितीतही कोरोनाशी दोन हात करताना जनतेला दिसत आहात. जेव्हा डोंबिवली हा परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला होता व त्याच सुमारास कल्याणहून रस्त्यावर फिरणाऱ्या साधारण पंचवीस एक लोकांना आपण पाथर्ली येथील बीएसपीयूत क्वारंटाईन केल्याचे समजले. तेव्हाच मी सुरूवातीलाच आपणास आधीच धोकादायक होत चाललेल्या डोंबिवलीत रहिवासी भागात अजून बाहेरचे संशयीत रूग्ण आणू नका, अशी फोनवर विनंती केली होती.

पाथर्ली भागात मागच्याच काही दिवसांपूर्वी कोरोनाचा एक रूग्ण आढळून आला होता. तसेच येथून जवळच असलेला आजदे सागर्ली भाग पण हॉटस्पॉट जाहीर केला आहे. अशातच आज मला समजले की त्यानंतरही काही संशयीत रूग्ण ज्यामध्ये काही तबलिगी यांचा समावेश आहे,असे एकूण १००च्या वर लोक इथे ठेवले आहेत. हॉटस्पॉटमध्ये आढळून आलेले रूग्ण त्या जागेपासून दूर नेणे अपेक्षित असताना, उलट बाहेरचे संशयीत या शहरात दाट वस्तीच्या ठिकाणी आणणे योग्य नाही व याच गोष्टींची माहिती आजूबाजूच्या परिसरात समजल्यावर लोकांमध्ये चिंतेचे व भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

Last Updated : Apr 21, 2020, 5:01 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.