ETV Bharat / state

एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या मागणीसाठी जोर वाढला, थेट अयोध्येत झळकले बॅनर - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

मुख्यमंत्रिपदावर एकमत होत नसल्यामुळं सरकार स्थापनेस विलंब होत असल्याची माहिती समोर येतेय. शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी आता थेट अयोध्या येथे एकनाथ शिंदेंचे बॅनर झळकलेत.

Eknath Shinde banner was displayed in Ayodhya
अयोध्येत एकनाथ शिंदेंचे झळकले बॅनर (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 27, 2024, 3:11 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता चार दिवस उलटून गेल्यानंतरही सरकार स्थापनेवरून महायुती एकमत होत नाहीये. विधानसभा निवडणुकीची मुदत 26 नोव्हेंबर रोजी संपलीय. त्यामुळं आता एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून राज्याचा कारभार पाहणार आहेत. दुसरीकडे महायुतीत भाजपा पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. शिवसेनेला दोन नंबरच्या जागा मिळाल्यात. एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांत मुख्यमंत्री म्हणून अतिशय उत्तमरीत्या काम केल्यामुळं ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावे, या मागणीचा जोर वाढू लागलाय. दरम्यान, भाजपाकडून देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावे, अशी भाजपा कार्यकर्त्यांची मागणी आहे. मागील दोन दिवसांपासून महायुतीत सत्ता स्थापण्यासाठी हालचालींना वेग आला असून, बैठकांचं सत्र जोरात सुरू आहे. मात्र मुख्यमंत्रिपद, मंत्रिपदं आणि खातेवाटप यावर एकमत होत नसल्यामुळं सरकार स्थापनेस विलंब होत असल्याची माहिती समोर येत आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी आता थेट अयोध्या येथे एकनाथ शिंदेंचे बॅनर झळकलेत.

बॅनरवर काय लिहिलंय : मागील दोन-तीन दिवसांपासून महायुतीत सरकार स्थापनेवरून बैठकांचा जोर वाढलाय. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपापल्या गटनेत्याची नियुक्ती केलीय. मात्र अद्यापपर्यंत भाजपाकडून गटनेतेपदाची नियुक्ती झालेली नाही. केंद्रीय पातळीवरील भाजपाच्या पक्षश्रेष्ठींची देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री व्हावेत, अशी भूमिका असली तरी इथे महायुतीत एकनाथ शिंदे नाराज असल्याचं बोललं जातंय. एकनाथ शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची संधी मिळावी किंवा बिहार पॅटर्न राज्यात लागू करावा, असे शिवसेना नेत्यांची मागणी आहे. मात्र बिहार पॅटर्न येथे लागू होण्याची ही वेळ नाही, असं भाजपा नेत्यांनी म्हटलेय. पण सध्या एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावेत, या मागणीला जोर धरू लागलाय. शिवसेना कार्यकर्ते आणि नेत्यांचीही मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेंच व्हावेत, अशी वक्तव्यं समोर येत असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी आता थेट अयोध्यात बॅनर झळकलेत. "एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा एकदा मुख्यमंत्री करावे, अशी मागणी अयोध्येतील नागरिकांनी केलीय. अयोध्या शहरामध्ये "अयोध्या वासियोंकी है पुकार.." "एकनाथ शिंदेंजी मुख्यमंत्री बने फिर एक बार...,” असा मजकूर बॅनरवर लिहिण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रातील जनतेसोबतच आता अयोध्येतील जनतेचाही वाढता पाठिंबा दिसून येतोय.

शिवसेनेकडून भाजपावर दबाव...: एकीकडे महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून एकमत होत नसताना आणि शपथविधी लांबणीवर गेला असताना दुसरीकडे आता 1 किंवा 2 डिसेंबरला शपथविधी होणार असून, देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी मागील दोन-तीन दिवसांपासून कार्यकर्ते वेगळ्या पद्धतीनं मागणी करीत आहेत. यात लाडक्या बहिणींनी सोमवारी सिद्धिविनायकाचे दर्शन घेत एकनाथ शिंदे पुन्हा एकदा महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून लाभावे. लाडका भाऊ एकनाथ शिंदे मुख्यमंत्री मिळावा, यासाठी लाडक्या बहिणींनी सिद्धिविनायकाकडे साकडं घातलंय. तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून बरे झालेल्या रुग्णांनी पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीला एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी साकडे घातलंय. काही मुस्लिम दर्ग्यात हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे, यासाठी चादर चढवली जातेय. दर्ग्यात दुवा केली जातेय. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी भाजपा कार्यकर्ते मंदिरात आरती करतात, तर तेही देवाला साकडे घालत आहेत. असे चित्र राज्यात मुख्यमंत्रिपदावरून असताना आणि महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच असताना आता थेट अयोध्या नगरीत एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रिपदासाठी बॅनर झळकल्यामुळं एक प्रकारे शिवसेनेच्या माध्यमातून भाजपावर मुख्यमंत्रिपदासाठी दबाव टाकला जात असल्याची चर्चा सुरू आहे.

शपथविधी कधी होणार? : निकाल लागल्यानंतर लगेचच आपण 26 नोव्हेंबरच्या आधी शपथविधी घेणार, असं महायुतीतील नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं. मात्र आता विधानसभा निवडणुकीत मुदत संपल्यानंतरही राज्यात सरकार स्थापन होत नाहीये. दुसरीकडे आता 1 किंवा 2 डिसेंबर रोजी शपथविधी होणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. तर भाजपाचे केंद्रीय पातळीवरील नेते म्हणजे नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शपथविधीसाठी सध्या वेळ मिळत नसल्याने शपथविधीस विलंब होत असल्याची चर्चा आहे. शपथविधी उशिरा होत असताना अजूनही महायुतीत मुख्यमंत्रिपदाचे नाव निश्चित होत नाही. यावरून महायुतीत समन्वय नाहीये किंवा सर्व काही त्यांच्यात आलबेल नाही, अशी टीकाही विरोधकांनी महायुतीवर केलीय.

हेही वाचा :

  1. "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार; एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्याची गरज"
  2. शिवसेनेचे खासदार घेणार मोदींची भेट, भेटीमागचे कारण काय?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.