Knee Pain Home Remedies: गुडघेदुखी ही गंभीर समस्या आहे. या समस्येनं केवळ वृद्धच नाही तर तरुणही त्रस्त आहेत. व्यायामाचा अभाव, अयोग्य आहार पद्धती तसंच लठ्ठपणामुळे बहुतेकांना गुडघेदुखीची समस्या उद्भवते. तसंच शरीरामध्ये व्हिटॅमिन डी, आयरन आणि कॅल्शियमची कतरता झाल्यास देखील गुडघेदुखीचा त्रास होतो. परंतु आहाराविषयक काही खबरदारी घेतल्यास तुम्ही गुडघेदुखीच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. तसंच ओमेगा 3 फॅटी अॅसिड सारखे पॉलीअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड केवळ हृदयाच्या आरोग्यासाठीच नव्हे तर सांधेदुखीवर सुद्धा उत्तम असल्याचं आहारतज्ञ डॉ. श्रीलता यांनी सांगितलं.
- गुडघेदुखीची कारणं: शरीरात कॅल्शियम किंवा प्रोटीनच्या कमतरतेमुळे गुडघेदुखीची समस्या उद्भवते. परंतु आहारात काही सौम्य बदल केल्यास तुम्ही गुडघेदुखीच्या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.
- हळद: हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट्स, दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात. तसंच हळद संधिवातावर रामबाण उपायापैंकी आहे. याच्या नियमित सेवनामुळे गुडघेदुखी बऱ्याच प्रमाणात कमी होते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात हळदीचा समावेश करावा किंवा तुम्ही कोमट दुधामध्ये हळद मिसळून पिऊ शकता. यामुळे तुम्हाला चांगला परिणाम मिळेल. तसंच हळदीची पेस्ट दुखण्याच्या जागी लावल्यास आराम मिळू शकतो.
- आलं: आलं प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात उपलब्ध असते. आल्यात असलेले दाहक विरोधी गुणधर्म गुडघेदुखीपासून आराम मिळवण्यासाठी उत्तम आहेत. ताज्या आल्याचं नियमित सेवन केल्यास गुडघेदुखी तसंच सांधेदुखीपासून आराम मिळतो. तुम्ही रोजच्या आहारात आल्याचा वापर करू शकता किंवा आल्याचा चहा बनवून पिऊ शकता. त्याचबरोबर आल्याचं पाणी बनवून देखील पिऊ शकता.
- लसूण: भारतीय जेवणामध्ये लसणाला विशेष स्थान आहे. लसणाच्या नियमित सेवनामुळे गुडघेदुखी आणि गुडघ्यावरील सूज कमी होते. यामध्ये प्रोटीन, आयर्न आणि व्हिटॅमिन मुबलक प्रमाणात आढळतात. चांगल्या फायद्यांसाठी तुम्ही तुमच्या आहारात लसणाचा समावेश करा. यामुळे गुडघेदुखी तसंच सांधेदुखीचा त्रास बरा होईल. तसंच तुम्ही सकाळी उपाशीपोटी देखील 3-4 लसणाच्या पाकळ्या खाल्ल्यास उत्तम फायदा होईल.
- हिरव्या भाज्या: हिरव्या भाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात. हे जळजळ कमी करण्यास मदत करतात. ब्रोकोली, काळे आणि लेट्यूस सारख्या हिरव्या भाज्या उत्तम पर्याय आहेत.
- फळं: सफरचंद, क्रॅनबेरी, जर्दाळू यांसारख्या फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर असतात. ते शरीरातून हानिकारक मुक्त रॅडिकल्स काढून टाकण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.
- मेथी: मेथीमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. म्हणूनच, हिवाळ्यात गुडघेदुखी टाळण्यासाठी ते प्रभावी दाहक-विरोधी म्हणून काम करते. मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी चावून घ्या. गुडघेदुखी टाळण्यासाठी हा एक सोपा घरगुती उपाय आहे. सांधेदुखीपासून आराम मिळण्यासाठी मेथीची पेस्टही लावता येते.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)