क्राइस्टचर्च Playing 11 Announced : इंग्लंड क्रिकेट संघानं न्यूझीलंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी आपली प्लेइंग 11 जाहीर केली. विशेष म्हणजे इंग्लंड संघानं तब्बल 48 तासाआधीच आपल्या संघाची प्लेइंग 11 जाहीर केली आहे. यात इंग्लंडकडून जेकब बेथेल पदार्पण करणार आहे. या युवा अष्टपैलू खेळाडूची तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी निवड करण्यात आली आहे. तर फलंदाजीच्या क्रमवारीत झालेल्या फेरबदलात ऑली पोपला सहाव्या क्रमांकावर ठेवण्यात आलं आहे. तो विकेटकीपिंग करताना दिसणार आहे. दोन्ही संघातील पहिला कसोटी सामना 28 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्चमध्ये सुरु होणार आहे.
England legend Graham Thorpe has been honoured in a new Crowe-Thorpe Trophy.
— England Cricket (@englandcricket) November 25, 2024
Part of the trophy is made up of the bat Graham used to score his first two centuries against New Zealand.
Graham's handwriting has been lifted off the face of his bat and inserted onto the trophy ❤️
तिसऱ्या क्रमांकावर केली नाही फलंदाजी : बेथेल गेल्या महिन्यात 21 वर्षांचा झाला. याआधी त्यानं प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कधीही तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केलेली नाही. वॉर्विकशायरकडून खेळणाऱ्या या अष्टपैलू फलंदाजानं 20 सामन्यांमध्ये 25.44 च्या सरासरीनं 738 धावा केल्या आहेत. त्यानं आपल्या प्रथम श्रेणी कारकिर्दीत सात विकेट्सही घेतल्या आहेत. तसंच त्यानं बर्मिंगहॅम फिनिक्ससाठी 7 सामन्यांत 165 धावा केल्यानंतर इंग्लंडकडून T20 आणि वनडे क्रिकेटमध्ये पदार्पण केलं.
The Crowe-Thorpe Trophy 🏆❤️ pic.twitter.com/PZ1wS6pKOO
— England Cricket (@englandcricket) November 25, 2024
जॉर्डन कॉक्स दुखापतीमुळं बाहेर : दरम्यान, यष्टीरक्षक जॉर्डन कॉक्स दुखापतीमुळं पदार्पण करु शकणार नाही. क्वीन्सटाउनमध्ये नेट सेशनदरम्यान त्याचा अंगठा तुटला. यामुळं त्याला मालिकेतून बाहेर व्हावं लागलं. कॉक्स याआधी रजेवर असलेला नियमित यष्टीरक्षक फलंदाज जेमी स्मिथच्या जागी आला होता. आता पोप विकेटकीपिंग करताना दिसणार आहे.
पोपसाठी महत्त्वाची मालिका : पोपसाठी ही एक महत्त्वाची मालिका आहे. पाकिस्तानमध्ये तीन सामन्यांत त्यानं केवळ 55 धावा केल्या होत्या. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये श्रीलंकेविरुद्ध घरच्या मैदानावर त्याचा खराब फॉर्म कायम राहिला. तिसऱ्या कसोटीत 154 धावा करुनही तीन सामन्यांच्या मालिकेतील उर्वरित पाच डावांत त्यानं केवळ 37 धावा केल्या.
✅ Test debutant
— England Cricket (@englandcricket) November 25, 2024
✅ A change at No. 3
Our XI for the first Test against New Zealand in Christchurch is here 👇
बेन डकेट आणि जॅक क्रॉली सलामीला : बेन डकेट आणि जॅक क्रॉली इंग्लंडसाठी फलंदाजीची सुरुवात करतील. तर जो रुट चौथ्या क्रमांकावर आणि हॅरी ब्रूक पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करतील. बेन स्टोक्स सातव्या क्रमांकावर असेल. इंग्लंडनं ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन आणि ब्रायडन कारसे या तीन वेगवान गोलंदाजांचा संघात समावेश केला आहे, तर शोएब बशीर हा एकमेव फिरकी गोलंदाज असेल.
इंग्लंडची प्लेइंग 11 : झॅक क्रॉली, बेन डकेट, जेकब बेथेल, जो रुट, हॅरी ब्रूक, ऑली पोप (यष्टिरक्षक), बेन स्टोक्स (कर्णधार), ख्रिस वोक्स, गस ऍटकिन्सन, ब्रायडन कार्स, शोएब बशीर.
हेही वाचा :