ETV Bharat / state

सरकार पडेल या भीतीने लोकल बंद, मनसेचे अविनाश जाधव पोलिसांच्या ताब्यात - मनसेचे संविनय कायदे आंदोलन

सर्वसामान्य प्रवाशांसाठी लोकलसेवा सुरू करा या मागणीसाठी मनसेच्या वतीने संविनय कायदेभंग आंदोलन हाती घेण्यात आले. यावेळी मनसे नेते अविनाश जाधव यांनी सरकार पडेल या भीतीने लोकल बंद ठेवली असल्याची टीका केली.

सरकार पडेल या भीतीने लोकल बंद
सरकार पडेल या भीतीने लोकल बंद
author img

By

Published : Sep 21, 2020, 1:50 PM IST

ठाणे- गेले सहा महिने बंद असलेली लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी खुली करावी, यासाठी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सविनय कायदाभंग आंदोलन हाती घेतले. सरकार पडेल या भीतीनेच जनतेला वेठीस धरले जात आहे. आज एकीकडे बस, टॅक्सी सेवा सुरू असून फक्त लोकलच का बंद ठेवली? असा सवाल करत ठाणे पालघरचे मनसे नेते अविनाश जाथव यांनी सरकारवर निशाणा साधला. या आंदोलना दरम्यान पोलिसांनी अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे.

मनसेच्या या आंदोलनाने धास्तावलेल्या पोलीस प्रशासनाने रेल्वे स्थानक परिसरात मोठा बंदोबस्त लावला होता. जीआरपीएफ आणि आरफीएफच्या जवानांनी संपूर्ण स्थानकात पहारा दिला आहे. तसेच परवानगी असलेल्यांनाच स्थानकात सोडत आहेत. त्यावेळी अविनाश जाधव यांना लोकलने प्रवास करण्यापूर्वीच पोलिसांनी ठाणे स्टेशनवर अडवून ताब्यात घेतले. तत्पूर्वी पत्रकारांशी बोलत असताना सरकारवर निशाणा साधला.

जाधव म्हणाले, रेल्वे ही मुंबईची जीवनवहिनी असून कोट्यवधी लोकांचे पोट त्यावर अवलंबून आहे. मुंबईच्या उपनगरातून दररोज लाखो नागरिक नोकरी आणि कामानिमित्त मुंबईकडे लोकलने प्रवास करतात. परंतु कोरोनाच्या महामारीमुळे हीच लोकल गेले सहा महिने बंद असल्याने नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळेच ही लोकल सेवा सर्वांसाठी खुली करावी, या मागणीसह मनसे तर्फे सविनय कायदेभंग करत लोकल प्रवासाची हाक देण्यात आली होती. मात्र, या आंदोलनाची दखल घेत रेल्वे प्रशासनाने प्रत्येक स्थानकावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. तरीही गनिमी कावा करून मनसैनिकांनी रेल्वेने प्रवास करत आपले संविनय कायदेभंग आंदोलन यशस्वी केले आहे.

मनसेच्या या संविनय कायदेभंग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नौपाडा पोलिसांनी ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले होते. मात्र, इतर मनसैनिकांनी दुसऱ्या वाटेने जाऊन रेल्वेचा प्रवास केलाच. एसटी आणि इतर बस सेवा सुरू असल्याने फक्त लोकल सेवाच बंद का ठेवण्यात आली आहे? असा संतप्त सवाल जाधव यांनी केला. कोरोना संकटाची परिस्थिती नीट न हाताळल्याने महाविकास आघाडी सरकार पडेल, अशी भीती सरकारला वाटत असल्याचा आरोपही जाधव यांनी यावेळी केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.