ETV Bharat / state

Avinash Jadhav Criticizes: मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील रस्त्यांच्या दुरवस्थेची मनसेने उडवली खिल्ली ... - Avinash Jadhav Criticizes On shinde Fadnavis

शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यातील 1200 शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मोफत खत वाटप करण्यात आले. यावेळी मनसेचे अविनाश जाधव हे ठाण्याहून शहापूरमध्ये कार्यक्रमाला येत असताना, त्यांना रस्त्यांच्या दुरवस्थेचा फटका बसला. त्यांनी कार्यक्रमात रस्त्यांच्या दुरवस्थेच्या विषय मांडत सरकारवर टीका केली.

Avinash Jadhav
अविनाश जाधव
author img

By

Published : Jun 29, 2023, 9:20 PM IST

माहिती देताना अविनाश जाधव

ठाणे : निर्णय गतिमान, महाराष्ट्र वेगवान’ अशी जाहिरातबाजी मार्च २०२३ ला शिंदे - फडणवीस सरकारने केली आहे. मात्र मुख्यमंत्री शिंदेंच्या जिल्ह्यातच विविध महामार्गांसह ३ तालुक्यातील रस्त्याची अवस्था बिकट असल्याने, त्याचा नाहक फटका नागरिकांना बसत आहे. त्यातच मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव हे ठाण्याहून शहापूरमध्ये एका कार्यक्रमात गेले असता, त्यांनाही रस्त्यांच्या दुरवस्थेचा फटका बसला. त्यांनी कार्यक्रमातच रस्त्यांच्या दुरावस्थेच्या विषय व्यथा मांडत सरकारवर टीका करत, आंदोलनाचा इशारा दिला आहे.

रस्त्यांची खूपच अवस्था बिकट : शिंदे सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून त्यांच्या जिल्ह्यातील विकास कामांना गती आली. विशेतः रस्त्यांची कामे आणि त्या मार्गावर पर्यायी मार्ग नसल्याने त्याचा फटका वाहन चालकांना बसत आहे. चार दिवसाच्या मुसळधार पावसांत भिवंडी, शहापूर, मुरबाड या तीन तालुक्यातील विविध रस्त्यांची खूपच अवस्था बिकट असल्याचा आरोप, मनसेचे जिल्हा अध्यक्ष जाधव यांनी केला आहे. शिवाय अनेक रस्ते खड्डेमय होऊन त्याची चाळण झाल्याने या रस्त्यावर वहातुक कोंडी प्रचंड प्रमाणात दिसत आहे. ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस कोठेच दिसत नाही. विशेष म्हणजे सर्वात दैनी अवस्था भिवंडी शहर आणि ग्रामीण भागातील रस्त्यांची झाली आहे. भिवंडीत कोणी यायला तयार होणार नसल्याचा टोला, नाव न घेता भिवंडी लोकसभेचे खासदार पाटील यांना जाधव यांनी लगावला आहे.

खताचे मोफत वाटप : गेल्या चार दिवसांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. खताची नितांत आवश्यकता असतानाच, तालुका मनसेच्या वतीने खताचे मोफत वाटप कार्यक्रम घेण्यात आला. शहापूर तालुक्यातील आदिवासी पाड्यातील 1200 शेतकऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनने तर्फे मोफत खत वाटप करण्यात आले. यावेळी दिलेल्या कुपन्सवर शेतकऱ्यांना अधिकृत खत वाटप दुकानात जाऊन खत खरेदी करायचे असल्याचे, आयोजक हॅरी खंडवी यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Kalwa Bridge Thane: कळवा पुलाची झाली जीर्ण अवस्था; या हेरीटेज पुलाचे करायचे काय? ठाणे मनपा प्रशासनासमोर प्रश्न
  2. Road Dug In Diva: मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलेला रस्ता पुन्हा एकदा खोदला; प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे नागरिकांना त्रास
  3. Road widening : अनेक वर्षांपासून रखडलेली हर्सूल रस्ता रुंदीकरण मोहिमेला सुरुवात

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.