ETV Bharat / state

'चायनासे देश बचाव'... ठाण्यातील चायनीज प्रकल्पाविरोधात मनसेचे आंदोलन - चायनीज प्रकल्पाविरोधात आंदोलन ठाणे

ठाणे शहरातील ढोकाळी परिसरात एका चायनीज कंपनीचा गृहप्रकल्प सुरू असून याची साधी माहिती देखील अद्याप कोणाला नाही. जवळपास या प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले असून शुक्रवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलन केले.

mns-agitation-against-chinese-project-in-thane
ठाण्यातील चायनीज प्रकल्पाविरोधात मनसेचे आंदोलन...
author img

By

Published : Jun 20, 2020, 1:03 AM IST

Updated : Jun 20, 2020, 6:06 AM IST

ठाणे- भारत-चीन सीमेवर वाढलेल्या तणावाचे पडसाद सर्वच स्तरावर उमटायला सुरुवात झाली आहे. त्याचे पडसाद ठाण्यातही उमटले आहेत. ठाण्यात सुरू असलेल्या एका चायनीज प्रकल्पाच्या विरोधात शुक्रवारी मनसेने आंदोलन केले. या प्रकल्पाच्या बाहेर अक्षरशः चायनीजमध्ये पाट्या लिहिल्या असून एका चायनीज कंपनीचा हा प्रकल्प आहे. त्यामुळे या पाट्या त्वरित काढण्यात आल्या नाही तर पुन्हा मनसे स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला आहे. यावेळी 'चायनासे देश बचाव' अशा घोषणा देखील मनसेच्या वतीने यावेळी देण्यात आल्या.

ठाण्यातील चायनीज प्रकल्पाविरोधात मनसेचे आंदोलन

ठाणे शहरातील ढोकाळी परिसरात एका चायनीज कंपनीचा गृहप्रकल्प सुरू असून याची साधी माहिती देखील अद्याप कोणाला नाही. जवळपास या प्रकल्पाचे काम पूर्ण होत आले असून शुक्रवारी मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाच्या ठिकाणी आंदोलन केले. यावेळी सुरू असलेले प्रकल्पाचे काम बंद करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या ठिकाणी चायनीजमध्ये बोर्ड लावण्यात आले असून ते बोर्ड हटवण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली.

जोपर्यंत भारत चायना संघर्ष संपत नाही तोपर्यंत या प्रकल्पातील एकही घर विकू देणार नाही, असा इशारा देखील जाधव यांनी दिला आहे. केवळ इशारा न देता हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचेही जाधव यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Last Updated : Jun 20, 2020, 6:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.