ETV Bharat / state

बांधकामांवर कारवाईला विरोध; एमएमआरडीए अधिकाऱ्यांना जमावाकडून मारहाण - angry people beat up the officer

काल्हेर कशेळी या ग्रामपंचायत भागात मोठ्या प्रमाणावर निवासी इमारतींचे बांधकाम झालेले आहे. यापैकी बहुतांश इमारती या अनधिकृत असून त्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. तर काही इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्याप्रमाणे एक जून पासून या ठिकाणी इमारती तोडण्याचे काम सुरू असताना काही इमारतींना अवघ्या चोवीस तासांची नोटीस बजावून इमारत तोडण्यास येथील स्थानिक राहणाऱ्या नागरिकांनी विरोध दर्शवला आहे.

MMRDA ACTION
एमएमआरडीए अधिकाऱ्यांना जमावाकडून मारहाण
author img

By

Published : Jun 18, 2021, 6:41 AM IST

Updated : Jun 18, 2021, 7:08 AM IST

ठाणे - भिवंडी तालुक्यातील ठाणे शहराच्या सीमे लगत असलेल्या कशेळी-काल्हेर परिसरातील अनेक इमारतींना एमएमआरडीए प्रशासनाने अनाधिकृत ठरवत कारवाई सुरू केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून या भागातील इमारती तोडण्याचे काम सुरू असून त्यामुळे येथे फ्लॅट खरेदी केलेल्या कुटुंबीयांच्या डोक्यावरील छत हिरावले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी त्या ठिकाणी स्थानिक आमदार शांताराम मोरे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे हे नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी घटनास्थळी आले होते. मात्र, त्या ठिकाणी चर्चेदरम्यान संतप्त जमावाने एमएमआरडीए अधिकारी प्रधान यांना पोलिसांच्या उपस्थितीत मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. यामुळे तूर्तास येथील बांधकामावर कारवाई थांबली आहे.

एमएमआरडीए अधिकाऱ्यांना जमावाकडून मारहाण
एमएमआरडीए अधिकाऱ्यांना जमावाकडून मारहाण
अवघ्या चोवीस तासांची नोटीस बजावून इमारतींवर कारवाई -

संपूर्ण ठाणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम असून एमएमआरडीए क्षेत्र अंतर्गत भिवंडी तालुक्यातील 60 ग्रामपंचायतीचा समावेश आहे. काल्हेर कशेळी या ग्रामपंचायत भागात मोठ्या प्रमाणावर निवासी इमारतींचे बांधकाम झालेले आहे. यापैकी बहुतांश इमारती या अनधिकृत असून त्याबाबतचा वाद न्यायालयात प्रलंबित आहे. तर काही इमारती तोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत. त्याप्रमाणे एक जून पासून या ठिकाणी इमारती तोडण्याचे काम सुरू असताना काही इमारतींना अवघ्या चोवीस तासांची नोटीस बजावून इमारत तोडण्यास येथील स्थानिक राहणाऱ्या नागरिकांनी विरोध दर्शवला आहे. या ठिकाणी दोनशेहून अधिक इमारतींना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे तब्बल हजारो कुटुंब या कारवाईमुळे बेघर होणार आहेत.

एमएमआरडीए अधिकाऱ्यांना जमावाकडून मारहाण
आत्मदहन आंदोलन करू परंतु कारवाई होऊ देणार नाही ..

कशेळी-काल्हेर या परिसरात ठाण्यापेक्षा निम्म्या किमतीत फ्लॅट मिळत असल्याने नागरिकांचा ठाणे बाळकुम येथील दोस्ती ग्रुप बिल्डरच्या 50 लाख रुपयांच्या फ्लॅटला ग्राहक मिळत नसल्याने ते ठाणे येथील राजकीय व्यक्तींना हाताशी धरून ही कारवाई फक्त काल्हेर कशेळी या भागातच करीत असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हा प्रमुख देवानंद थळे यांनी केला आहे. येथील इमारती ज्या जागेवर उभ्या आहेत त्या जागा एन ए झालेल्या खासगी जागा आहेत, त्यांची परवानगी ग्रामपंचायतीने दिली असून त्यासाठी मुद्रांक शुल्क भरून त्याची खरेदी नागरीकांनी केली असून त्यासाठी बँकांकडून अनेकांनी कर्ज घेतले आहेत. त्यांना देशोधडीला लावण्याचे काम एमएमआरडीए अधिकारी करीत असल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. तसेच यानंतर कारवाई थांबविण्यासाठी आत्मदहन आंदोलन करण्याचा इशाराही देवानंद थळे यांनी दिला आहे.

Last Updated : Jun 18, 2021, 7:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.