ठाणे : ठाण्यात सत्ताधाऱ्यांनी घातलेला धुमाकूळ यावर ठाणेकर जरी मौन धारण करून बसले असले तरीही आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मात्र सत्ताधाऱ्यांना सडेतोड उत्तर देण्यास सुरुवात केलेली आहे. राष्ट्रवादीला संपवण्याचा सुरु झालेल्या कंटाळा शह देत २५ जानेवारीला राष्ट्रवादी आमदार जितेंद्र आव्हाड हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत ठाण्यात गाडीतून फिरले, एकाच मंचावर आले. आणि जैन मंदिरात उद्धव ठाकरेंना घेऊनही गेले. त्यामुळे हा पराक्रम शिंदे गटाच्या अस्तित्वाला सुरुंग लावणारा ठरत आहे.
जगदाळे यांनी माहिती दिली : मुंब्र्यातून जवळपास 6 जण शिंदें गटाच्या गळाला लागले. संख्याबळ वाढावे म्हणूनच बंपर ऑफर देण्यात आली. 1 कोटी रोकड आणि तिकीट तर दुसरी ऑफर 1 कोटी रोकड 10 कोटीचे कंत्राट अशी ऑफर देण्यात आली. सहा नगरसेवक निश्चित फुटणार याची कल्पना आव्हाडांना आहे. दरम्यान, दुसरीकडे ठाण्यातही अशीच बंपर ऑफर दिल्याने व्यवसायाने बिल्डर असलेल्या राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक यांनाही आमदारकीची विधान परिषदेत संधीची ऑफर दिल्याने हनुमंत जगदाळे यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. त्यामुळे आता हनुमान जगदाळे आमदारकीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेना या पक्षात जाणार असून, जाताना आमदारकी सोबतच क्लस्टर डेव्हलपमेंटचा लाभही घेण्याच्या उद्देशाने जाणार असल्याची माहिती खुद्द जगदाळे यांनी दिली आहे.
खोक्याचा बोका बळी पडू नका : राष्ट्रवादीमध्ये कुठल्याही नेत्यावर नाराज नाही ही कबुली देखील दिली. मात्र, हनुमान जगदाळे जाताना एकटे जाणार नसून, जाताना सवंगडे असे जवळपास सहा ते आठ लोकांना घेऊन जाणार असल्याचे विश्वसनीय सुत्राकडनं समजते. मात्र, जगदाळे व्यतिरिक्त हे सहा-सात कोण हा प्रश्न अजूनही गर्भगळीतच आहे. मात्र, येणाऱ्या काही दिवसातच हालचालीवरून यांच्या नावाचाही रोजगार होणार आहे. मात्र, याला राष्ट्रवादीच्या वतीने मात्र बॅनरबाजी करत उत्तर दिले जात आहे. खोक्याचा बोका बळी पडू नका असे बॅनर कळवा आणि मुंब्रा भागात झळकले आहेत.
कळवा मुंब्रा विभागामध्ये लागलेल्या बॅनर्सने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नगरसेवकांना स्वतःला विकू नका असा ठळक लाल अक्षरांत लिहिलेल्या मजकुरामार्फत पैशासाठी शिंदे गटात सामील न होण्याचे आवाहन स्थानिक नगरसेवकांना केले गेले आहे. कळवा आणि मुंब्रा विभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांची संख्या मोठी असून, जितेंद्र आव्हाड यांच्या या बालेकिल्ल्याला खिंडार पडण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे गटाकडून केला जात असल्याच्या बातम्या आल्यानेच स्थानिक समाजसेवक रवींद्र पोखरकर यांनी हे बॅनर्स लावले आहेत.
हेही वाचा : मी माझ्या लोकांसोबत चाललो! राहुल गांधींना अश्रू अनावर; ऐतिहासिक भारत जोडो यात्रेचा समारोप