ETV Bharat / state

मिठागर खाडीत पोहताना बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह किनाऱ्यावर सापडले - ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथक

शनिवारी दुपारी कोपरी येथील मिठागर खाडीत पोहण्यासाठी गेलेल्या आणि नंतर बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह पोलिसांना खाडीच्या किनाऱ्यावर आढळून आले.

बेपत्ता मुलांचे मृतदेह सापडले
author img

By

Published : Jul 15, 2019, 8:27 AM IST

ठाणे- जिल्हातील कोपरी येथील मिठागर खाडी परिसरात पोहण्यासाठी गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह रविवारी सापडले. या घटनेनंतर कोपरी परिसरात शोकाकुल वातावरण तयार झाले आहे. दोन्ही मुलांची बेपत्ता असल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

बेपत्ता मुलांचे मृतदेह सापडले
मृतक शुभम देवकर (वय, 15) आणि प्रवीण कंचारी (वय, 15) असे मृत मुलांची नावे आहेत. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी या दोन्ही मुलांचे मुतदेह रविवारी शोधून काढले. ही दोन्ही मुले शनिवारी पोहण्यासाठी गेले होते. रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने या मुलांच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. शुभम देवकर आणि प्रवीण कंचारी हे दोघेही कोपरीच्या सुभाष नगरचे रहिवासी होते. शनिवारी दुपारी कोपरी येथील मिठागर खाडीत घरी न सांगता ही मुले पोहण्यासाठी गेले होते. यानंतर दोघेही बेपत्ता झाले. त्यांचा शोध सुरू केला असता दोघांचे कपडे खाडीच्या किनाऱ्यावर आढळून आले. यानंतर ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक आणि पोलिसांनी या दोघांचा खाडीत शोध सुरू केला. यावेळी रविवारी दोन्ही मुले मृत अवस्थेत पोलिसांना आढळून आले. कोपरी पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पाण्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Intro:
पोहण्यास गेलेली आणि बेपत्ता झालेल्या दोन मुलांचे मृतदेह सापडलेBody:

ठाण्यातील कोपरी येथील मिठागर खाडी परिसरात पोहण्यास गेलेल्या आणि बेपत्ता झालेल्या दोघा मुलांचे मृतदेह रविवारी सापडले. या घटनेने कोपरी परिसरात वातावरण शोकाकुल झाले आहे. दोन्ही मुले बेपत्ता झाल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेली होती.
मृतक शुभम देवकर (15) आणि प्रवीण कंचारी (15) असे दोघा मृत मुलांची नावे आहेत. ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलिसांनी दोन्ही मुतदेह रविवारी शोधून काढले. दोघेही शनिवारी पोहण्यासाठी गेले होते. दोन्ही मुले शनिवार दुपार पासून बेपत्ता झाली होती. रात्री उशिरा पर्यंत घरी न परतल्याने या दोन्ही मुलांच्या मिसिंगची तक्रारही कोपरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती. शुभम देवकर आणि प्रवीण कंचारी हे दोघेहीजण कोपरीच्या सुभाष नगरमध्ये राहतात. हे दोघे शनिवारी दुपारी कोपरी येथील मिठागर खाडीत घरी न सांगता पोहण्यासाठी गेले होते. त्यानंतर दोघेही बेपत्ता झाले होते. त्यांचा शोध सुरू केला असता दोघांचे कपडे खाडी किनारी आढळून आले. त्यानंतर ठाणे पालिका आपत्ती व्यवस्थापन पथक व पोलिसांनी या दोघांचा खाडीत शोध सुरू केला होता. यावेळी रविवारी दोन्ही मुलांचे मृतदेह आढळून आले. कोपरी पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. पाण्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघांचा बुडून मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.