ETV Bharat / state

Shambhuraj Desai on Sanjay Raut: श्रीकांत शिंदेंना बदनाम करण्यासाठीच संजय राऊतांचे आरोप; मंत्री शंभुराज देसाई यांची टीका - Shambhuraj Desai Thane

खासदार संजय राऊत यांनी केलेल्या धमकीच्या आरोपावरून मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे. मंत्री देसाई म्हणाले की, खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठीच संजय राऊतांनी आरोप केले आहेत. मंत्री देसाई ठाण्यात बोलत होते.

Shambhuraj Desai
शंभूराज देसाई
author img

By

Published : Feb 22, 2023, 8:25 PM IST

पालकमंत्री शंभूराज देसाई माध्यमांसोबत बोलताना

ठाणे: मला जीवे मारण्याची सुपारी खासदार श्रीकांत शिंदे यांनी गुंड राजा ठाकूर यांना दिली आहे, असा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. या आरोपावर मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठीच संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. तसेच राऊत यांनी नाहक स्वतःचे महत्व वाढवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा टोला मंत्री शंभुराज देसाई यांनी लगावला आहे.

मंत्री शंभूराज देसाईंची टीका: पालकमंत्री शंभूराज देसाई हे बुधवारी ठाणे दौऱ्यावर होते. शिवसेना सातारा जिल्हासंपर्क प्रमुख शरद कणसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर शंभुराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी संजय राऊत, जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले.

राऊतांचा केविलवाणा प्रयत्न: मंत्री देसाई म्हणाले की, खासदार श्रीकांत शिंदे यांना बदनाम करण्यासाठीच संजय राऊत असे वक्तव्य करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर लक्ष द्यायला लोकांना वेळ नाही, संजय राऊत बोलायला लागल्यानंतर त्यांना कुणीही गांभिर्याने घेत नाही. उलट लोक टीव्हीच बंद करतात, अशी खोचक टीका त्यांनी राऊतांवर केली. स्वतःचे महत्व वाढवुन सुरक्षा मिळवण्याचा त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचे देखील त्यांनी सांगितले. संजय राऊतांच्या आरोपात कोणतेही तथ्य नसुन त्यांच्या या विधानावरून त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असे सष्ट केले. तसेच शरद पवारांनी याआधीही अशी वक्तव्ये केल्याचे सांगत नाव न घेता टोला लगावला.

आव्हाडांच्या टीकेला प्रत्युत्तर: ठाणे महापानगरलिकेत प्रत्येक मजल्यावर गुंड उभे असतात. या जितेंद्र आव्हाड यांनी केलेले टीकेला प्रत्युत्तर देताना मंत्री देसाई म्हणाले की, सर्वसामान्य लोकांच्या दैनंदिन कामे, नागरी सुविधांची कामेही महापालिकांमध्ये केली जातात, तरी पण आव्हाड यांच्याकडे अशा पद्धतीची काही माहिती असेल. तर मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्यांनी जरूर माझ्याकडे तक्रार द्यावी, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.

आनंद आश्रमातून शिवसेनेचा कारभार: निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर प्रथमच कार्यकारणी बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिवसेनेचे प्रमुख कार्यालय म्हणून शिवसेनाप्रमुखाच्या खांद्याला खांदा लावणारे आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमाची निवड करण्यात आली. याच आनंद आश्रमामधून शिवसेनेचा पुढील कारभार चालवला जाणार असेल तर, त्यापेक्षा दुसरी आनंदाची गोष्ट नाही, असे शंभूराज देसाई यांनी सांगितले.

हेही वाचा: Raja Thakur Wife Allegation: संजय राऊतांनी माझ्या पतीला गुंड ठरवून बदनाम केले; राजा ठाकूर यांच्या पत्नीचा आरोप

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.