ETV Bharat / state

Minister Jitendra Avhad : मंत्री जितेंद्र आव्हाडांचा पालिका उपायु्क्तांना फोन..; म्हणाले, हे कायद्याचे राज्य, हिटलर शाही नाही.. - मंत्री जितेंद्र आव्हाडांचा पालिका उपायुक्तांना फोन

मंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Avhad ) यांनी पालिकेचे उपायुक्त स्वप्नील सावंत ( MNC DyC Swapnil Sawant ) यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून चांगलाच समाचार घेतला. जागा पालिकेची जरी असली तरी त्याच्या वरती गोरगरीब जनता राहत आहे. 95 च्या अगोदरचे स्थानिक त्याठिकाणी आहेत तर त्यांना 268 अन्वये नोटीस का दिली नाही? १५ दिवसांत कागदपत्रे सादर करण्यास का सांगितले नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.

Minister Jitendra Avhad
मंत्री जितेंद्र आव्हाड
author img

By

Published : Jan 26, 2022, 3:19 PM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा-भाईंदर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Minister Jitendra Avhad ) यांनी महापालिकेच्या उपायुक्तांना चांगलेच झापले. काशिमिरा परिसरातील आरक्षण क्रमांक 364 मध्ये झोपड्यांवर कारवाई पालिकेकडून करण्यात आली. संदर्भात सदर परिसरातील नागरिकांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे तक्रार केली असता तत्काळ पालिकेचे उपायुक्त स्वप्नील सावंत ( MNC DyC Swapnil Sawant ) यांना फोन करून पुनर्वसन न करता कारवाई कशी केली? हे राज्य कायद्याचे आहे हिटलरशाही नाही चालणार, अशा प्रकारचे वक्तव्य त्यांनी केले.

स्थानिक रहिवाशांची माहिती -

मीरा भाईंदर मधील काशीमीरा परिसरातील आरक्षण क्रमांक 364 या जागेवर असलेल्या अनेक झोपडपट्टीवर पालिकेकडून तोडक कारवाई करण्यात आली. मात्र, या परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे की, 1990,92,95 च्या काळापासून या जागेवर आम्ही राहत आहोत. मागील 20 ते 25 वर्षांपासून घरपट्टीदेखील आम्ही भरली आहे. अचानकपणे बाजूला असलेल्या विकासकाच्या फायद्यासाठी आमच्यावर कारवाई केली असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली.

हेही वाचा - Sanjay Raut on Opposition : 'मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे राज्यात उत्साह, तर मुख्यमंत्र्यावर टीका करणारे नामर्द'

होप फाऊंडेशनचे अध्यक्ष साहिल मिश्रा यांच्यासहित 20 ते 25 महिलांनी मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन लेखी निवेदन देत आपल्या वेदना मांडल्या. याची दखल घेत तत्काळ मंत्री आव्हाड यांनी पालिकेचे उपायुक्त स्वप्नील सावंत यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून चांगलाच समाचार घेतला. जागा पालिकेची जरी असली तरी त्याच्या वरती गोरगरीब जनता राहत आहे. 95 च्या अगोदरचे स्थानिक त्याठिकाणी आहेत तर त्यांना 268 अन्वये नोटीस का दिली नाही? १५ दिवसांत कागदपत्रे सादर करण्यास का सांगितले नाही, असा प्रश्न त्यांनी विचारला.

थेट बेधडक कारवाई कोणाच्या बोलण्यावर केली? जरी आयुक्तांचा आदेश असला तरी बेकायदेशीर आदेशाचे आपण पालन करणार का? असा प्रश्न त्यांनी उपायुक्तांना विचारला. यापुढे त्या जागेवर राहणाऱ्या रहिवाशांच्या घरांवर जर बुलडोजर चढवला तर त्या जागेवर मी स्वतः येईल, असा दमही मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिला. अगोदर त्यांचे पुनर्वसन करा, त्यांच्या हातात चाव्या द्या, त्यानंतर झोपड्या तोडा, अशी सूचना त्यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.