नवी मुंबई - वाशी येथे असणाऱ्या एक्सिबिशन सेंटरमध्ये कोविड रुग्णालय उभारण्याची तयारी आता नवी मुंबई मनपाने केली आहे. ही तयारी अंतिम टप्प्यात आली आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी नवी मुंबईत सर्व पक्षीय आढावा बैठक घेतली. शहरात वाढत्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने काय काळजी घेता येईल व कोणत्या उपयोजना करण्यात येतील यावर यावेळी चर्चा करण्यात आली.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने नवी मुंबईत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे, भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि पदाधिकारी उपस्थित होते. शहरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणखी कोणत्या उपाय योजना करता येतील यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. यावेळी नवी मुंबईत व्हेंटिलेटर रुग्णालय उभारणी करणार असून २०० व्हेंटिलेटर बेड नव्याने तयार करणार असल्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच कोरोना संशयित रुग्णांवर विना कोविड रुग्णालयांनी उपचार करावेत असेही शिंदे म्हणाले.