ETV Bharat / state

'मी नाराज हा शोध नारायण राणेंनी कुठून लावला माहित नाही; ते महाविकास आघाडीत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करताहेत' - eknath shinde reply to narayan rane news

माझ्या नाराजीचा शोध राणेंनी कुठून लावला हे मला माहिती नाही. माझ्या कामात मातोश्री किंवा मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याच्या वक्तव्यात अजिबात तथ्य नाही. मला माझ्या खात्याचे निर्णय घेण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. मी माझ्या पक्षात आणि विभागात मोकळेपणाने काम करतो आहे. मी समाधानी आहे.

eknath shinde
मंत्री एकनाथ शिंदे
author img

By

Published : Aug 22, 2021, 5:02 PM IST

Updated : Aug 22, 2021, 5:08 PM IST

ठाणे - मी नाराज असल्याचा शोध केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी कुठून लावला याबाबत माहिती, असे प्रतिक्रिया नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मंत्री एकनाथ शिंदे याबाबत बोलताना

काय म्हणाले होते नारायण राणे?

राज्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. यात्रेदरम्यान, राणे यांनी वसई येथे पत्रकार परिषदेत बोलताना शिवसेनेत अंतर्गत मतभेद असल्याचा दावा केला होता. 'एकनाथ शिंदे यांच्या खात्यात 'मातोश्री'चा व मुख्यमंत्र्यांचा प्रचंड हस्तक्षेप आहे. त्यामुळे शिंदे कंटाळले आहेत. ते पर्यायाच्या शोधत असून लवकरच योग्य निर्णय घेतील,' असा दावा त्यांनी केला होता. राणेंच्या या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. तर नारायण राणेंच्या या वक्तव्याला एकनाथ शिंदे यांनी प्रत्त्युतर देत त्यांनी राणेंचे वक्तव्य खोडून काढले आहे.

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

माझ्या नाराजीचा शोध राणेंनी कुठून लावला हे मला माहिती नाही. माझ्या कामात मातोश्री किंवा मुख्यमंत्र्यांचा हस्तक्षेप असल्याच्या वक्तव्यात अजिबात तथ्य नाही. मला माझ्या खात्याचे निर्णय घेण्याचे पूर्णपणे स्वातंत्र्य आहे. मी माझ्या पक्षात आणि विभागात मोकळेपणाने काम करतो आहे. मी समाधानी आहे. निर्णय स्वातंत्र्य असल्यामुळेच अनेक लोकहिताचे निर्णय मी आातापर्यंत घेऊ शकलो आहे. युनिफाइड डीपीसीसारखे लोकहिताचे निर्णय माझ्याच कार्यकाळात झाले आहे. समृद्धी महामार्ग यशस्वीपणे पुर्ण करत आहे. तसेच

नारायण राणे हे स्वत: मुख्यमंत्री होते. खाते कोणतेही असो, धोरणात्मक किंवा मोठे निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनेच होत असतात. राणेंना हे चांगले माहीत आहे. उद्या त्यांना मोठ्या निर्णय घ्यावयाचा असले तरी पंतप्रधानांची संमती लागणार आहे. त्यामुळे त्यांचं वक्तव्य हे केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून हे संभ्रम पसरवण्याचे काम सुरू आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारचे काम उत्तमरित्या सुरू आहे. यापेक्षा अधिक बोलण्याची गरज नाही, असे म्हणत त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणेंचे वक्तव्य खोडून काढले.

Last Updated : Aug 22, 2021, 5:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.