ETV Bharat / state

भिवंडीत एमआयएमच्या जिल्हाध्यक्षाला खंडणी मागताना रंगेहात पकडले - thane MIM

भिवंडी शहरातील एका बांधकाम व्यवसायिकाने ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाकडे काही दिवसांपूर्वी खालिद व त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रात्रीच्या सुमाराला सापळा रचून आरोपींना रंगेहाथ पकडले आहे.

भिवंडी क्राइम
भिवंडीत एमआयएमच्या जिल्हाध्यक्षाला खंडणी मागताना रंगेहात पकडले
author img

By

Published : Sep 25, 2020, 12:02 PM IST

ठाणे - भिवंडी एमआयएमच्या जिल्हा अध्यक्ष खालिद उर्फ गुड्डू शेख याने एका बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणीची मागणी केली होती. या प्रकरणी खंडणीची रक्कम स्वीकारताना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने शेखसह चौघांना रंगेहात पकडून बेड्या ठोकल्या आहेत.

भिवंडी क्राइम
भिवंडीत एमआयएमच्या जिल्हाध्यक्षाला खंडणी मागताना रंगेहात पकडले

या घटनेमुळे भिवंडीतील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून खालिदसह त्याचे साथीदार इफ्तीखार मुक्तार शेख उर्फ बबलू उर्फ कानिया ,फैज आलम, गुलाम खान यांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

भिवंडी शहरातील एका बांधकाम व्यवसायिकाने ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाकडे काही दिवसांपूर्वी खालिद व त्याच्या साथीदारांविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने रात्रीच्या सुमाराला सापळा रचला होता. त्यावेळी आरोपी खालीद व त्याचे साथीदार इफ्तीखार मुक्तार शेख उर्फ बबलू उर्फ कानिया ,फैज आलम, गुलाम खान यांना बांधकाम व्यावसायिकाकडून एक लाखाची खंडणी घेताना रंगेहात बेड्या ठोकण्यात आल्या. यावेळी आरोपीच्या ताब्यातून एक लाख पंचवीस हजार रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.

याप्रकरणी भिवंडी शहर पोलीसठाण्यात भादंवि कलम 364 अ, 386, 387, 34 आर्म्स अॅक्ट 3,25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा पुढील तपास गुन्हे शाखा घटक क्र. 1 करत आहे.

दरम्यान, खालिदने राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन मागील विधानसभा निवडणुकीला भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून एमआयएमच्या वतीने निवडणूक लढवली होती. मात्र त्याला काही हजारांच्या मताने पराभव पत्करावा लागला होता. दुसरीकडे कॉंग्रेसच्या नगरसेवकांने खालिदला ठार मारण्याची सुपारी दिल्याचे उघड झाले होते. यामुळे खालिदची गुन्हेगारी पार्श्वभूमी उघडकीस आली होती.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.