ठाणे - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वजण आपापल्या घरीच थांबून आहेत. पण, मुंब्र्यात काही जण बाहेर फिरतानाचे चित्र व्हायरल होत होते. मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी येथील नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले होते. त्यानतंर मुंब्र्यातील मौलाना तौकिल अहमद शम्सी यांनी समस्त मुस्लीम धर्मियांना घरातच नमाज अदा करण्याचे आवाहन केले आहे. तसे मशीद बंद करुन तशा सुचनाचे फलकही मशीदीबाहेर लावले आहे.
टाळंबंदीनंतर सर्वच धार्मिक स्थळे बंद करण्यात आली होती. पण, काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज पडणे सुरूच होते. आता इतर मशिदीप्रमाणे सगळ्याच मशिदी बंद करण्यात आल्या आहेत. शुक्रवारची नमाज देखील घरीच पडण्याचे आवाहन मौलाना शम्सी यांनी केले होते. त्यामुळे शुक्रवारीही मशिद बंद ठेवण्यात आली होती. कोरोनाचे संक्रमण थोपविण्यासाठी नागरिकांमध्ये सामाजिक अंतर ठेवणे गरजेचे असल्याने नागरिकांनी घरातच राहून सहकार्य करण्याचे आवाहन मौलानांनी केले.
हेही वाचा - ठाण्यात संचारबंदीत विदेशी मद्यासह तरूण ताब्यात