ETV Bharat / state

'पुन्हा सैराट' ? 'कॉपर टी’मुळे नव्हे, तर ‘त्या’ विवाहितेचा खून - खून

सपनाचे उत्तरप्रदेशातील बस्ती जिल्ह्यात असलेल्या तिच्याच गावातील मागासवर्गीय राजकुमार गौतम याच्याशी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला आहे. त्यानंतर ती पतीसह भिवंडी येथे राहत होती. मात्र पती कंपनीत गेल्यानंतर सपनाच्या गळ्यावर अज्ञात आरोपीने धारदार शस्त्राने वार करुन खून केल्याची घटना घडली आहे.

सपना
author img

By

Published : Feb 7, 2019, 1:07 PM IST

ठाणे - एक महिन्याच्या प्रसूतीनंतर संतती नियमनासाठी २१ वर्षीय विवाहितेने कॉपर टी बसवून घेतल्याने प्रकृती ढासळून विवाहितेचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद शांतीनगर पोलिसांनी दाखल केली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात तिचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने त्या विवाहितेच्या खुनाला कलाटणी मिळाली आहे. सपना राजकुमार गौतम असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मृत सपनाचे उत्तरप्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील तिच्याच गावातील मागासवर्गीय राजकुमार गौतम याच्याशी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला आहे. तिने पळून जावून प्रेमविवाह केला. तेव्हापासून सपनाच्या माहेरच्या मंडळीने तिच्याशी संबंध तोडले आहेत. तेव्हाच त्यांनी ' बदला ' घेण्याची धमकी दिली होती. तिच्या प्रेमविवाहावरुन उत्तरप्रदेशमधील बस्ती जिल्ह्यातील स्थानिक पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हेही दाखल आहेत.

मृत सपनाला सव्वा वर्षांची एक मुलगी तर एक पंचवीस दिवसांचे बाळ आहे. दोन मुले झाली तरी माहेरचे कोणीही तिची विचारपूस करण्यासाठी भिवंडीत फिरकले नाही. मात्र तिच्या माहेरच्यांनी कायमचा ' डूख ' धरल्याने तिच्या खुनात ' सैराटचा ' प्रकार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. दोन पोलीस पथकं उत्तर प्रदेशकडे रवाना केली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून देण्यात आली आहे.

undefined

अधिक तपासात पोलिसांना मृत सपनाच्या वैद्यकीय तपासणीत तिच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे आढळून आले असून तिचा खून झाल्याचे उघड झाले आहे. किचन रुममधील चाकूनेच मानेवर भोसकल्याची निशाणी आहे. सदरचा चाकू तिने स्वतःच मानेत खुपसला अथवा अन्य कोणी ? याबाबत अजूनही साशंकता व्यक्त केली जात असल्याने या खुनी घटनेचे रहस्य उलगण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सपनाचा पती राजकुमार हा यंत्रमाग कारखान्यात कामावर गेलेला असताना हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी पतीसह अन्य तिघांची कसून चौकशी केली. मात्र त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. मृत सपनाच्या मृत्यूची प्रथम आकस्मिक नोंद करण्यात आली. मात्र त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीपान सोनावणे यांनी अज्ञात मारेकऱ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, मृत सपनाला पंधरा महिन्यांच्या चिमुरडीसह पंचवीस दिवसांचे तान्हे बाळ तिच्या कुशीत असताना ही हत्या झाल्याने ती मुले पोरकी झाली आहेत. बापाच्या कुशीत आईची उब घेण्याचा प्रयत्न ते चिमुकले करीत आहेत. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला.

कॉपर टी’मुळे मृत्यू नव्हे, तर ‘त्या’ विवाहितेचा खून सैराटच्या पुनरावृत्तीतून झाल्याचा संशय  

ठाणे :- एक महिन्याच्या प्रसूतीनंतर संतती नियमनासाठी २१ वर्षीय विवाहितेने कॉपर टी बसवून घेतली होती. ती चुकीची बसवण्यात आल्याने प्रकृती ढासळून विवाहितेचा आदी अकस्मात  मृत्यू झाल्याची नोंद शांतीनगर पोलिसांनी दाखल केली होती. मात्र शवविच्छेदन अहवालात तिचा खून झाल्याचे उघडकीस आल्याने त्या विवाहितेच्या खुनाला कलाटणी मिळाली आहे. सपना राजकुमार गौतम असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मृत सपना हिचे उत्तरप्रदेशच्या  बस्ती जिल्ह्यातील  तिच्याच गांवातील मागासवर्गीय जातीतील राजकुमार गौतम याच्याशी तीन वर्षांपूर्वी  प्रेमविवाह झालेला आहे. तेव्हापासून सपनाच्या माहेरच्या मंडळीने तिच्याशी संबंध तोडले असून तिने पळून जावून  प्रेमविवाह केला. तेव्हाच त्यांनी ' बदला ' घेण्याची धमकी दिली होती. तिच्या प्रेमविवाहावरून उत्तरप्रदेश मधील बस्ती जिल्ह्यातील स्थानिक पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हेही दाखल आहेत.

मृतक सपना हिला सव्वा वर्षांची एक मुलगी तर एक पंचवीस दिवसांचे बाळ आहे. दोन मुले झाली तरी माहेरचे कोणीही तिची विचारपूस करण्यासाठी भिवंडीत फिरकले नाही. मात्र तिच्या माहेरच्यांनी कायमचा ' डूख ' धरल्याने  तिच्या खूनात ' सैराटचा ' प्रकार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून दोन पोलीस पथके उत्तर प्रदेशकडे रवाना केली आहेत असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

अधिक तपासात पोलिसांना  मृत सपना हिच्या वैद्यकीय तपासणीत तिच्या मानेवर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याचे आढळून आले असून तिचा खून झाल्याचे उघड झाले आहे. किचन रूममधील चाकूनेच मानेवर भोसकल्याची निशाणी आहे. सदरचा चाकू तिने स्वतःच मानेत खुपसला अथवा अन्य कोणी ? याबाबत अजूनही साशंकता व्यक्त केली जात असल्याने या खूनी घटनेचे रहस्य उलगण्यासाठी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे. सपना हिचा पती राजकुमार हा यंत्रमाग कारखान्यात कामावर गेलेला असताना हा प्रकार घडला  आहे. पोलिसांनी पतीसह अन्य तिघांची कसून चौकशी केली. मात्र त्यात काहीही निष्पन्न झाले नाही. मात्र सपना हिचे उत्तर प्रदेशच्या बस्ती जिल्ह्यातील तिच्याच गांवातील मागासवर्गीय जातीतील राजकुमार गौतम याच्याशी तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला आहे. तेव्हापासून सपनाच्या माहेरच्या मंडळीने तिच्याशी संबंध तोडले असून तिने पळून जावून प्रेम विवाह केला तेव्हाच त्यांनी ' बदला ' घेण्याची धमकी दिली होती. तिच्या प्रेमविवाहावरून बस्ती जिल्ह्यातील स्थानिक पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात गुन्हेही दाखल आहेत. माहेरच्यांनी कायमचा ' डूख ' धरल्याने तिच्या खूनात ' सैराटचा ' प्रकार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून दोन पोलीस पथके उत्तर प्रदेशकडे रवाना केली आहेत असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. मृत सपना हिच्या मृत्यूची प्रथम आकस्मिक नोंद केली. मात्र त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक संदीपान सोनावणे यांनी अज्ञात इसमाविरोधात खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान, मृतक सपनाला पंधरा महिन्यांची चिमुरडीसह पंचवीस दिवसांचे तान्हे बाळ तिच्या कुशीत असताना हि हत्या झाल्याने ती मुले पोरकी झाली असून बापाच्या कुशीत आईची उब घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. आहे. 

( मृतक फोटो, घटनास्थळ व्हीजवल, आणि बाईट )

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.