ETV Bharat / state

Valentine Day 2023: लाल, गुलाबी गुलाबांनी बाजारपेठ बहरली, एका फुलाची किंंमत आहे इतकी... - सेल्फी वूईथ फोटो फ्रेम

कोरोनाचे निर्बंध उठवण्यात आल्यानंतर राज्यात सण, उत्सव उत्साहात पार पडले. आता महाविद्यालयात साजरे होणारे विविध डेंचा फिव्हर असून आज व्हॅलेंटाईन डे आहे. त्यानिमित्ताने बाजारात गिफ्ट आर्टिकलपेक्षा, तरुणांईना भुरळ घालणारी, आकर्षक डिझाईनर लाल, गुलाबी, गुलाबांनी तसेच चाॅकलेट आणि टेडीने बहरली आहे. तर दोन हजार ते पाच हजारांच्या घरात यांच्या किंमत असल्याचे फुल विक्रेते यांनी सांगितले.

Valentine Day 2023
गुलाबांनी बाजारपेठ बहरली
author img

By

Published : Feb 14, 2023, 1:16 PM IST

ठाणे: दोन अडीच वर्षांच्या कोरोनाच्या कालावधी नंतर व्हॅलेंटाईन डे निमित्ताने फुलांची बाजारपेठ लाल, गुलाबी रंगी बेरंगी गुलाबाच्या फुलांनी बहरून गेली आहे. पिवळ्या रंगातील एशियाटिक लिलीची तिन फुल १७५रूपये , किंमतीने जरा महाग पांढऱ्याशुभ्र रंगाची ओरिएंटल लिली २५० रूपयाला आहेत. तर प्रेमाचे मराठीतून संदेश देणारे बदामाच्या आकारातील ग्रिटींग कार्ड १५० ते २०० रूपये, छोटे -छोटे मेसेज लिहिण्यासाठी २० रूपयाचे गिफ्ट कार्ड प्रेमविरांना खरेदी करण्यासाठी बाजारात उपलब्ध आहेत.

प्रेमात किंमतीकडे पाहायचे नसते: तर एरवी १० रूपयाला मिळणारे एका लाल गुलाबाच्या फुलाची किंमत व्हॅलेंटाईन डे पार्श्वभूमीवर ५०ते ६० रूपयाला झाली आहे. तर घाऊक बाजारात ४०० रूपयात २० फुलांच्या गुच्छाची किंमत आहे. व्हॅलेंटाईन डे आहे म्हणून हजाराच्या आसपास किंंमती असून प्रेमात किंमतीकडे पाहयचे नसते. एक दिवस होऊ दे खर्च. मग प्रेमाच्या भावना व्यक्त करणारे लाल गुलाबाचे फूल महाग पडले तरी चालेल. अशा भावना खरेदीसाठी आलेल्या जोडप्यांनी व्यक्त केल्या. तर सेल्फी वूईथ फोटो फ्रेम मधील जोडपे तरूणाईंना खरेदी करण्यासाठी खुणावत आहे.

प्रेमासाठी वापरले जाते फूल: जगात प्रेम वक्त करण्यासाठी फुलांचा वापर केला जातो. आजारपणाने ठीक होण्यासाठी, वाढदिवसासाठी आणि प्रेम वक्त करण्यासाठी फुलांचा वापर केला जातो. आता हीच फुले प्रेम वक्त करण्यासाठीही अनेक दशकांपासून वापरली जातात. भारतात शेती होणाऱ्या फुलांपेक्षा आयात केलेल्या फुलांची मागणी ही मोठी आहे. म्हणून पर्याय असल्याने भारतातील फुलांची मागणी वाढली आहे. या प्रेमाच्या दिवसाला लागणारे सगळे गुलाब आपल्या वर्षभराच्या किंमत्तीत भर घालत महाग झाले आहेत. तरीही ग्राहकांची मागणी काही केल्या कमी होत नाही.

गुलाब सगळ्यांचे फेवरेट: गुलाबांच्या सर्व प्रकारांची मागणी काही दिवसांपासून वाढली आहे. रोज डे आणि खासकरून फेब्रुवारी महिन्यात असलेला व्हॅलेंटाईन डे हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना उत्पन्न देणारा ठरतो. कारण याच दिवशी लाल आणि गुलाबी गुलाबाची मागणी जगभरात वाढते. त्यामुळे देशभरात गुलाबाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना या दिवसाला जास्त उत्पन्न मिळते. त्यासोबत विदेशात ही भारतातील लाल गुलाबाला चांगली मागणी आहे. म्हणून त्यामुळे उत्पन्न ही वाढलेले पाहायला मिळत आहे .

हेही वाचा: Valentine Day 2023 नवऱ्यासाठी बनवले सोन्याचे दिल सूरतच्या तरुणीचे अनोखे व्हॅलेन्टाईन गिफ्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.