ETV Bharat / state

ठाण्यातील अनेक परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा; नागरिक आजारी, प्रशासन ढिम्म

परिसरातील रहिवाशांना गढूळ पाणी येत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. पावसाळा सुरु झाल्यापासून नागरिकांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर करावा लागत असल्याने त्यांना झुलाब, उलट्या, ताप या आजारांची लागन होण्याची शक्यता बळावली आहे.

गढूळ पाणी दाखविताना परिसरातील नागरिक
author img

By

Published : Jul 24, 2019, 8:56 AM IST

ठाणे- स्मार्ट शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महापालिकेपासून एक ते दीड किमीच्या अंतरावरील ज्ञानेश्वर नगर परिसरातील नागरिकांना गेल्या चार महिन्यांपासून गढूळ पाणी प्यावे लागत आहे. गढूळ पाणी पिऊन परिसरातील जवळपास ७० टक्के नागरिकांना गंभीर आजारांची लागण झाली आहे. मात्र, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याची संत्पत प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

माहिती देताना दत्तात्रय जाधव आणि विठाबाई सोनवने

ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये सध्या डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले आहे. नुकताच ज्ञानेश्वर नगर परिसरातील एका मुलीचा डेंग्यूने मृत्यू झाला आहे. या मुलीबरोबरच याच परिसरातील मोरे नामक व्यक्तीला देखील डेंग्यूची लागण होऊन त्याचा मृत्यू झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यातच या परिसरातील रहिवाशांना गढूळ पाणी येत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत. पावसाळा सुरु झाल्यापासून नागरिकांना पिण्यासाठी गढूळ पाण्याचा वापर करावा लागत असल्याने त्यांना झुलाब, उलट्या, ताप या आजारांची लागन होण्याची शक्यता बळावली आहे.

ज्ञानेश्वर नगर परिसरातील लोकसंख्या ही १२ ते १५ हजारांच्या घरात आहे. शुद्ध पाणी मिळाविण्यासाठी लोकांना परिसरापासून ५०० मीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत आहे. अनेकवेळा स्थानिक नगरसेवकाला विचारणा करूनही नगरसेवकाकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. विशेष करून या सर्व समस्येला महिला वर्ग कंटाळला असून त्यांच्याकडून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असल्याने नागरिकांचा जीव गेला असून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी, सामाजिक कार्यकर्ते निलेश महाडिक यांनी केली आहे. तर या समस्येचा सातत्याने पाठपुरावा करणारे बिभीषण देवकर, दत्तात्रय जाधव, आणि चंद्रकांत नागिमे यांनी थेट आंदोलन करण्याचा प्रशासनाला इशारा दिला आहे .

जाणून घ्या परिसरातील लोकांच्या व्यथा...

काही दिवसांपूर्वी माझ्या एक वर्षाच्या नातवंडाला ताप आला होता. त्याला तातडीने रुग्नालयात नेल्याने अनुचित घटना टळली. पाणी खूप दूषित असल्याने त्यात तुरटी टाकून त्याचा वापर करावा लागत आहे. नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा हा प्रकार असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे या परिसरातील रहिवाशी कुसूम कळसकर यांनी सांगितले.

याच परिसरातील रंजना मेनगुदळे यांच्या म्हणण्यानुसार, गढूळ पाणी पिल्याने परिसरातील नागरिकांना उलट्या, झुलाब आणि इतर साथीचे आजार झाले आहे. मात्र, याकडे लोकप्रतिनिधी अक्षरशः दुर्लक्ष करत आहेत. तीन नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याचे रंजना मेनगुदळे यांचे म्हणणे आहे. उषा भोसले यांना कावीळ तर विटाभाई सोनावणे यांना झुलाब आणि उलट्या झाल्यामुळे या दोघींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असल्याचे माहिती पडले.

Intro:गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण आजारपणामुळे नागरिक हैराण Body:

स्मार्ट शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या महापालिकेपासून एक ते दीड किमीच्या अंतरावरील ज्ञानेश्वर नगर परिसरातील नागरिकांना गेल्या चार महिन्यांपासून अक्षरशः गढूळ पाणी प्यावे लागत आहे. विशेष म्हणजे हे गढूळ पाणी पिऊन या परिसरातील जवळपास ७० टक्के नागरिकांना झुलाब, उलट्या, ताप यासारखे आजार झाले असून आतापर्यंत या परिसरात डेंग्यूने दोघांचा मृत्यू झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे . हे गढूळ पाणी पिऊन या परिसरात असणाऱ्या प्रत्येक घरातील एक किंवा दोन सदस्य आजारी पडत असून प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे . यावर त्वरित उपाय न केल्यास साथीचे आजार बळावण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे .
ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये सध्या डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले असून ज्ञानेश्वर नगर परिसरातील एका मुलीचा नुकताच डेंग्यूने मृत्यू झाला आहे . या मुलीबरोबरच याच परिसरातील मोरे नामक व्यक्तीला देखील डेंग्यूची लागण होऊन त्याचा मृत्यू झाला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे . ठाणे महापालिकेच्या काही अंतरावर असणाऱ्या ज्ञानेश्वर नगर परिसरात अक्षरशः भयावह परिस्थिती असून या परिसरातील रहिवाशांना जेवढे पाणी येते तेवढे गढूळ येत असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त आहेत . पावसाळा सुरु झाल्यापासून या गढूळ पाण्याचा वापर पिण्यासाठी आणि वापरण्यासाठी नागरिकांना करावा लागत आहे . हे पाणी इतके गढूळ आहे कि एक तर पाणी नागरिकांना उखळून प्यावे लागत आहे, नाहीतर या पाण्यात तुरटी टाकून मग या पाण्याचा वापर नागरिकांना करावा लागत आहे .
ज्ञानेश्वर नगर परिसरातील लोकसंख्या ही १२ ते १५ हजारांच्या घरात आहे . या परिसरात बहुतांश बैठी चाळी असून जेवढी घरे या परिसरात आहे तेवढ्या सर्व घरांमध्ये असेच गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . मोठ्या नागरिकांमध्ये लहान मुलांना देखील ताप आणि आणि झुलाबासारखे आजार झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातारण आहे . शुद्ध पाणी मिळावे यासाठी या परिसरातपासून ५०० मीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत असून ते सुद्धा पाणी मिळेल का नाही देखील सांगता येत नाही . अनेकवेळा स्थानिक नगरसेवकाला विचारणा करूनही नगरसेवकांकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे . विशेष करून या सर्व समस्येला महिला वर्ग कंटाळला असून लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपाचा संताप व्यक्त करण्यात येत आहे . आरोग्य सेवेचा बोजवारा उडाला असल्याने नागरिकांचा जीव गेला असून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते निलेश महाडिक यांनी केली आहे. तर या समस्येचा सातत्याने पाठपुरावा करणारे बिभीषण देवकर, दत्तात्रय जाधव, आणि चंद्रकांत नागिमे यांनी तर आता थेट आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे .
काही दिवसांपूर्वी माझ्या एक वर्षाच्या नातवंडाला ताप आला होता . आणि त्याने डोळे देखील पांढरे केले होते . त्वरित हॉस्पिटलमध्ये नेल्याने पुढची घटना टळली. पाणी एवढे दूषित आहे कि तुरटी टाकून पाण्यातील गाळ खाली बसला कि मग हे पाणी वापरता येते . नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा हा प्रकार असून प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचे या परिसरातील रहिवाशी कुसुम कळसकर यांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच याच परिसरातील एका सात महिन्याचा मुलीला देखील ताप आला होता.
याच परिसरात राहणाऱ्या रंजना मेनगुदळे यांच्या म्हणण्यानुसार हे गढूळ पाणी पिऊन परिसरातील नागरिकांना उलट्या, झुलाब आणि इतर साथीचे आजार झाले असून लोकप्रतिनिधी मात्र अक्षरशः दुर्लक्ष करत आहेत . तीन नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला असल्याचे रंजना मेनगुदळे यांचे म्हणणे आहे . उषा भोसले यांना कावीळ तर विटाभाई सोनावणे यांना झुलाब आणि उलट्या झाल्यामुळे या दोघी देखील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते .

BYTE :- स्थानिक नागरिक १ , २, ३, Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.