ठाणे : भिवंडी शहारत गुन्हेगारींच्या घटनेत दिवसागणिक कलामाची वाढ झाल्याचे, भिवंडी झोन मधील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या गुन्ह्यांच्या नोंदीवरून दिसुन येत आहे. शहरातील टेमघर परिसरात भरदिवसा रस्त्यात गाठून एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरटयांनी धूम स्टाईलने (Mangalsutra thieves with gold chain) पळविल्याची घटना समोर आहे. या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत (caught on CCTV) कैद झाला असून; चोरटयांना पोलिसांचा धाकच उरला नसल्याची चर्चा शहरात रंगली आहे. Mangalsutra Thieves Capture In CCTV
भिवंडी शहरातील टेमघर परिसरात असलेल्या सिद्धिविनायक सोसायटीत राहणारी वृद्ध महिला आज दुपारच्या सुमारास रस्त्याने चालत सोसायटीपर्यत आली. त्याच सुमारास त्याच्यावर पाळत ठेवून दुचाकीवरील दोघा चोरटयांनी सिद्धिविनायक सोसायटीच्या मुख्य प्रवेश दारावरच त्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचून पळ काढला. मात्र महिलेचे मंगळसूत्र खेचताना त्या चोरटयांनी महिलेला फरफटत खेचून नेले. या घटनेत ती जखमी झाली असून; या महिलेने आरडाओरडा केला परंतु तोपर्यंत चोरटे दुचाकीवरून पसार झाले होते.
या रस्त्यावर ही पहिली घटना नसून, अश्या याआधी देखील अनेक घटनांमध्ये सोनसाखळी चोरट्याने या परिसरात धुमाकूळ घालून गळ्यातील दागिने लंपास केले आहेत. मात्र वारंवार घडत असलेल्या घटनांकडे शांतिनगर पोलीस गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप नागरिक करीत आहे. दिवसाढवळ्या गुन्ह्यांच्या घटनेला पोलीस प्रशासन कधी आळा घालणार असा प्रश्न आता नागरिकांकडून केला जात आहे.Mangalsutra Thieves Capture In CCTV