ठाणे: मुंब्रा टाउनशिपमधील देवरीपाडा भागात शनिवारी ही घटना घडली आहे. या गुन्ह्यामागील नेमका हेतू शोधण्यासाठी तपास सुरू आहे. आसिफ असे आरोपीचे नाव आहे. त्याला सोमवारी अटक करण्यात आले, अशी माहिती मुंब्रा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिली. आरोपी आणि त्याच्या पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वारंवार भांडणे होत होती. आरोपीची पत्नी पीडितेच्या आईची मैत्रिण होती आणि ते वारंवार बोलायचे जे त्याला आवडत नव्हते, असे अधिकाऱ्याने सांगितले.
आरोपीला अटक: शनिवारी आरोपींनी दोन्ही मुलांना ते खेळत असलेल्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिल्याचे त्यांनी सांगितले. यात मुलाचा जागीच मृत्यू झाला तर त्याची बहीण गंभीर जखमी झाली. मुलगी घरी जाऊन वडिलांना सांगितले की, त्यांच्या शेजाऱ्याने त्यांना इमारतीतून फेकले आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. मुलांच्या आईच्या तक्रारीच्या आधारे, पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 302 (हत्या) आणि 307 (हत्येचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला.
सख्ख्या भावावर हत्येचा गुन्हा: ठाणे येथे असे सारखे गुन्हे घडत आहेत. अशीच एक घटना घडली होती. अनैतिक संबंधाच्या संशयातून भावानेच भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. ही घटना उल्हासनगर शहरातील शहाड भागातील एका कॉलनीमध्ये घडली होती. याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात सख्ख्या भावावर हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केले होते. अमित असे अटक केलेल्या भावाचे नाव होते. तर रोहित असे निर्घृण हत्या झालेल्या भावाचे नाव होते.
वहिनी-दीराचे चोरीछुपे संबंध: पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार मृतक आणि आरोपी हे अंबरनाथ शहरात एकत्र राहत होते. दोघेही सख्ये भाऊ असून दोघांचा विवाह झाला आहे. मृत मोठा भाऊ रोहितने आरोपी लहान भावाच्या पत्नीशी जवळीक साधून तिच्याशी अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी दोघांना अनैतिक संबंध प्रस्थापित करताना मृतकच्या पत्नीने पाहिले होते. तेव्हापासूनच दोघा भावात वाद सुरू झाले. त्यानंतर काही नातेवाईकांनी मध्यस्थी करत प्रकार थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र तरीही मृत मोठा भाऊ चोरीछुपे संबंध करीत असल्याचे आरोपी भावाला समजले होते. त्यातच उल्हासनगर शहरातील शहाड फाटक परिसरात छत्रपती शाहू महाराज कॉलनीत राहणाऱ्या आजीकडे मृतक रोहितचा दुपारच्या सुमारास आला होता. त्यावेळी आजीच्या घरातच आरोपी अमित आणि मृतक रोहित या दोघा भावांमध्ये जोरदार भांडण झाले होते. यानंतर मृतक रोहित आजीच्या घरात झोपला होता. यावेळी आरोपी भाऊ अमितने झोपलेल्या रोहितचा खून केला होता.
हेही वाचा: Thane Crime अनैतिक संबंधाच्या संशयातून सख्ख्या भावाची हत्या आरोपी भाऊ गजाआड