ETV Bharat / state

Man Murder Wife : अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून; पोलिसांनी आवळल्या पतीच्या मुसक्या - खून

अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने पत्नीचा खून केल्याने ठाण्यात खळबळ उडाली. पत्नीचा खून करुन पळालेल्या मारेकरी पतीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.

Man Murder Wife
मारेकऱ्यांसह पोलीस
author img

By

Published : Apr 22, 2023, 2:08 PM IST

Updated : Apr 22, 2023, 3:21 PM IST

ठाणे : पर पुरुषाशी अनैतिक संबधांच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून करणाऱ्या पतीच्या मुसक्या आवळण्यात उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. ही घटना बदलापूर पूर्वेतील राऊत चौकातील एका मोठ्या इमारतीत घडली होती. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील पतीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने खून केलेल्या पत्नीचे वय ३५ वर्षे आहे.

अनैतिक संबंधाच्या संशयातून पत्नीचा गळा चिरून खून

बुधवारी पतीन केला पत्नीचा खून : बदलापूर पूर्वेच्या शिरगाव परिसरातील राऊत चौकात राऊत सबंधित इमारत आहे. या इमारतीत मारेकरी पती हा आपल्या ३५ वर्षीय पत्नी आणि मुलासह राहत होता. त्यातच बुधवारी १९ एप्रिलला दुपारी त्याची पत्नी ही राहत्या घरात मृतावस्थेत आढळून आली. याबाबतची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार करून तिचा खून करण्यात आल्याचे पोलीस पथकाला दिसून आले.

फोन बंद करुन पती झाला फरार : पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून महिलेचा मृतदेह ताब्यात घेत बदलापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना केला होता. दरम्यान, पोलीस तापसात पत्नीची हत्या तिच्या नवऱ्यानेच केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. त्या दृष्टीने बदलापूर पोलीस व उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने समांतर तपास सुरू केल्याची माहिती बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी दिली होती. या घटनेनंतर आरोपी पती हा फरार झाला होता. शिवाय त्याचा मोबाईल फोनही बंद येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

रेल्वेने पळून जाण्याच्या तयारीत असताना घेतले ताब्यात : उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाला आरोपी हा रेल्वेने बाहेरगावी पळून जाण्याच्या तयारी असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती. या माहितीच्या आधारावर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी कल्याण रेल्वे स्थनाकात सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याच्याकडे पोलीस पथकाने अधिक चौकशी केली असता, त्यानेच बायकोचा खून केल्याची कबुली दिली. माझ्या बायकोचे पर पुरुषाशी अनैतिक संबध असल्याने मी तिचा खून केल्याचेही त्याने यावेळी सांगितले. त्यानंतर उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला बदलापूर पूर्व पोलिसांच्या ताब्यात दिले. बदलापूर पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास बदलापूर पूर्व पोलीस करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र अहिरे यांनी दिली.

हेही वाचा - Sex racket busted मुंबईत 'सेक्स रॅकेट'चा पर्दाफाश, भोजपुरी अभिनेत्रीला अटक

Last Updated : Apr 22, 2023, 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.