ETV Bharat / state

Live in a Relationship - 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहणाऱ्या विधवा महिलेचा खून, आरोपी पसार - विठ्ठलवाडी पोलीस

एका 36 वर्षीय प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ( Live in a Relationship ) राहणाऱ्या विधवा महिलेचा भिंतीवर डोके आपटून खून ( Murder of a Widow ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागातील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.

विठ्ठलवाडी पोलीस ठाणे
विठ्ठलवाडी पोलीस ठाणे
author img

By

Published : Mar 16, 2022, 7:24 PM IST

ठाणे - एका 36 वर्षीय प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ( Live in a Relationship ) राहणाऱ्या विधवा महिलेचा भिंतीवर डोके आपटून खून ( Murder of a Widow ) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना कल्याण पूर्वेतील चिंचपाडा भागातील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ( Vitthalwadi Police Station ) खुनाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. अनिल भातसोडे ( वय 36 वर्षे, रा. चिंचपाडा), असे खून करून पसार झालेल्या प्रियकराचे नाव आहे. तर सुकन्या आव्हाड, असे खून झालेल्या विधवा महिलेचे नाव आहे.

'या' वादातून झाला खून - मृत सुकन्या ही 17 वर्षीय मुलीसोबत विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचपाडा गावात राहात होती. तिच्या पतीचे 7 वर्षांपूर्वी निधन झाले होते, उदरर्निवाहसाठी दोघी माय लेकी केटरर्सचा व्यवसाय करत होत्या. या दरम्यान आरोपी अनिलशी मृत विधवा महिलेची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये सूत जुळल्याने लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. मात्र, काही दिवसांपासून दोघांमध्ये लग्नावरून वाद झाला. त्यानंतर तो मृत महिलेला बाहेर भेटायला बोलावयाचा तसेच तिच्याकडे पैशाची मागणी करत होता. याच वादातून मंगळवारी (दि. 15 मार्च) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास मुलगी घराबाहेर उभ्या केलेल्या रिक्षात मोबाईल बघत होती. तेव्हा मुलीला आईचा ओरडण्याचा व भांडे पडल्याचा आवाज आला. तेव्हा तिने खिडकीतून डोकावले असता आरोपी अनिल भातसोडे हा आई सुकन्या हिला लाथाबुक्कीने मारत तिचे डोके भिंतीला आपटत होता. त्या मारहाणीत तिचा मृत्यू झाला.

गेल्या तीन महिन्यापासून राहत होते वेगळे - त्यावेळी आरोपी घरातून पळून जात असताना मुलीने पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो पळून जाण्याचा यशस्वी झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला व भातसोडे हे काही वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये होते. मात्र, काही कारणास्तव ते मागील तीन महिन्यापासून वेगळे राहत असले, तरी आरोपी हा मृत महिलेला बाहेर बोलावून घेऊन जात होता. दरम्यान, आज सकाळी महिलेचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला असून आरोपी अनिल भातसोडे याचा शोध घेत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

हेही वाचा - Most Wanted Criminal : भोईवाडा पोलिसांनी कुख्यात गुंडाच्या आवळल्या मुसक्या, साथीदारासह लाखोंचा मुद्देमाल जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.